Next
ठाण्यातील रस्त्यांची महापालिका आयुक्तांकडून पाहणी
प्रेस रिलीज
Friday, June 23, 2017 | 03:42 PM
15 0 0
Share this article:

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्त्यांच्या कामाची पाहणी केली.

ठाणे : ठाणे शहरामध्ये ज्या रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्या सर्व रस्त्यांची महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली. ती कामे तात्काळ पूर्ण करण्याचे, तसेच जी कामे पूर्ण होणार नाहीत ती कामे सुरक्षित अवस्थेत आणण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.

महापालिका आयुक्तांनी या पाहणी दौऱ्यात पोखरण रोड नं. १, पोखरण रोड नं. २, सुरेंद्र इंडस्ट्रीज, तसेच प्रस्तावित पारसिक चौपाटी आदी ठिकाणी भेट दिली. या वेळी जयस्वाल यांनी उपवन, गावंड बाग ते घाणेकर आणि टिकुजिनीवाडी ते घोडबंदर रोड या रस्त्याची पाहणी करून ही कामे सुरक्षित अवस्थेत आणण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे निसर्ग उद्यानाच्या रस्त्यावर विद्युत व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. 

पोखरण रोड नं. दोनवर सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी करून ज्या ठिकाणची कामे पूर्ण झालेली नाहीत, त्या ठिकाणी पावसाळ्यात अपघात होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search