Next
‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’चा शुभारंभ
BOI
Thursday, October 11, 2018 | 06:18 PM
15 0 0
Share this article:

पुणे लोकमान्य फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी उद्योजक कृष्णकुमार गोयल, नरेश मित्तल, संजय चोरडिया, अॅड. गणेश सातपुते, विनायक रासकर,गोरख सातपुते आदी मान्यवर

पुणे : शहरातील लोकप्रिय अशा ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’चे उद्घाटन घटस्थापनेच्या मुहूर्तावर बुधवारी (दि.१०) झाले. या वेळी ‘महाकाल’ या ढोल पथकाच्या गजरात देवीची प्राणप्रतिष्ठापना नरेश मित्तल यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून, उद्योजक कृष्णकुमार गोयल, संजय चोरडिया, भारत देसडला,विनायक रासकर, गोरख सातपुते, लोकमान्य फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. 

या महोत्सवानिमित्त लोकमान्यनगर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे हे एकविसावे वर्ष असून, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच दांडिया महोत्सव, तसेच रावण दहनाचा कार्यक्रम हे खास आकर्षण असणार आहे. 

पुणे लोकमान्य फेस्टिव्हलमध्ये  शिव बँड, माझ्या मना (मराठी, हिंदी गाण्यांचा कार्यक्रम) नृत्य स्पर्धा, ‘नटले मी तुमच्यासाठी’ हा लावणी महोत्सव, जादुगार रघुवीर यांचे जादूचे प्रयोग; तसेच कोजागरी पौर्णिमानिमित्त होम मिनिस्टर (खेळ रंगला वहिनींचा) कार्यक्रम होणार आहेत. पुणे शहरातील नऊ कर्तृत्वान महिलांचा सन्मानही या महोत्सवात  करण्यात येणार आहे.

या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष गणेश सातपुते असून, उत्सवाचे अध्यक्ष नरेश विठ्ठल आणि संयोजक महेश महाले, शुभांगी सातपुते आदित्य सातपुते, गौरव शेठ, ऋषिकेश भोसले, चेतन सोनवणे हे आहेत. 

या महोत्सवात समुहनृत्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क : 
आदित्य सातपुते : ८८८८७ ३३८८६,   गौरव सैतवाल : ९७३०३ ८०९०२ 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search