Next
दक्षिण दिग्विजयातील सोनेरी पान - त्रिचनापल्ली
BOI
Wednesday, May 23, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

रॉक फोर्ट

‘करू या देशाटन’च्या गेल्या भागात आपण तमिळनाडूचे महाराष्ट्राशी नाते सांगणाऱ्या तंजावरची सफर केली. या भागात जाऊ या त्रिचनापल्लीला. त्रिचनापल्ली हे मराठ्यांच्या इतिहासातील दक्षिण दिग्विजयातील एक सोनेरी पान आहे.
..............
त्रिचनापल्ली/तिरुचिरापल्ली/त्रिची/तिरुचीतमिल अशा अनेक नावांनी हे ठिकाण ओळखले जाते. एका पौराणिक कथेनुसार त्रिशिर नावाच्या दैत्यावरून याचे नाव ‘त्रिशिरापल्ली’ असे पडले. त्यानंतर कालौघात त्याचे रूपांतर त्रिचनापल्ली असे झाले. (पल्ली म्हणजे गाव)

त्रिचनापल्लीचा इतिहास : पल्लव राजवटीत इ. स. ५००मध्ये बांधलेले गुंफा मंदिर येथे आहे. पल्लव येथे सत्ता राखू शकले नाहीत आणि येथील किल्ला चोल राजांच्या ताब्यात आला आणि नंतर तो पंड्या राजांच्या गेला. त्यानंतर १०व्या शतकात तो परत चोल राजवटीकडे आला आणि पुढे तो विजयनगर साम्राज्यात जाईपर्यंत चोल राजांकडेच होता. त्यानंतर मुघल सेनापती मलिक काफूरने तो जिंकला. हा भाग १६व्या शतकापर्यंत विजयनगर साम्राज्यात होता. त्यानंतर तो मदुराईच्या नाईकांच्या ताब्यात आला. नाईकांनी किल्ल्यावर मंदिर व महाल बांधले. राणी मीनाक्षीकडून किल्ला चंदासाहिब यांच्याकडे गेला. त्याने फ्रेंच लोकांशी संधान बांधले होते. त्याच्या चुलत्याने ब्रिटिशांच्या मदतीने किल्ला ताब्यात घेतला आणि ब्रिटिशांना तमिळनाडूत पाय रोवण्याची संधी मिळाली.

त्रिचनापल्लीत्रिचनापल्ली हे मराठ्यांच्या इतिहासातील दक्षिण दिग्विजयातील एक सोनेरी पान आहे. दक्षिणेतील सरदार औरंगजेबाला सामील होऊ नयेत, यासाठी संभाजी महाराजांनी म्हैसूरच्या चिक्कदेव राजाशी मैत्रीचा प्रयत्न केला होता; पण तो गर्विष्ठ होता. त्याने मराठ्यांच्या तीन पराक्रमी सरदारांची कत्तल करून त्यांची मुंडकी श्रीरंगपट्टणमच्या वेशीवर टांगली होती. औरंगजेबाचे स्वराज्यावर आलेले संकट सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याकडे काही काळ सोपवून छत्रपती संभाजी महाराज दक्षिणेकडे निघाले. संभाजीराजांनी त्रिचनापल्लीच्या पाषाणकोटाला वेढा घातला. फार मोठा रणसंग्राम झाला. मराठ्यांनी किल्ल्यावर अग्निबाणांचा वर्षावही केला आणि अखेरीस त्यांनी किल्ला जिंकला. त्यानंतर मात्र म्हैसूरकर चिक्कदेवाचे धाबे दणाणले आणि तो तह करण्यासाठी तयार झाला. संभाजीराजांनंतर पुन्हा १७४१मध्ये या किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे आला. रघुजी भोसले यांनी ही मोहीम पार पाडली.

रॉक फोर्टरॉक फोर्ट : येथील रॉक फोर्टचा (पाषाणकोट) खडक हिमालयापेक्षा पुरातन असल्याचे भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे. हा खडक ३८०० दशलक्ष वर्षांपूर्वीचा असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. एक मैल लांब (१.५ किलोमीटर) लांब, अर्धा मैल रुंद (०.७५ किलोमीटर) आणि २८० फूट उंच अशा एकाच आयताकृती पाषाणावर हा किल्ला उभा आहे. म्हणून त्याला रॉक फोर्ट असे नाव रूढ झाले. किल्ल्यावर सर्वांत उंच ठिकाणी गणेश मंदिर असून, तेथे जाण्यासाठी ४३४ पायऱ्या आहेत. उचिपिल्लयारकोईल या नावानेही ते ओळखले जाते. त्याच्या शेजारीच शिवमंदिर असून, त्यातील शिवलिंग मूळ पाषाणातच कोरून काढलेले आहे. शेजारी १००० स्तंभांचा मणिमंडप अवशेष रूपात राहिला आहे. रॉक फोर्टवरून त्रिची शहराचे विहंगम दृश्य दिसते.

गुंफा मंदिर : गुंफा मंदिर पल्लव राजा महेंद्र वर्माने बांधले. येथे तमिळ भाषेतील शिलालेख असून, त्यावर १०४ ओव्या कोरल्या आहेत.

श्री रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगमश्री रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम : कावेरी नदीच्या काठावरच श्रीरंगास्वामींची तीन मंदिरे आहेत. आदिरंगा मंदिर म्हैसूरजवळील श्रीरंगपट्टण येथे, मध्यरंगा मंदिर शिवसमुद्रम येथे आणि अंत्यरंगा मंदिर त्रिचनापल्लीजवळ आहे. कावेरी नदीतील द्वीपकल्पावर उभारलेले हे वैष्णव मंदिर आहे. हे मंदिर भारतातील विष्णूच्या प्रमुख मंदिरांमध्ये गणले जाते. चोल राजवटीत याची उभारणी झाली असावी, असे सांगितले जाते. याचा उल्लेख संगमयुगातील (इ. स. १०० ते इ. स. २००) तमिळी साहित्यामधील शिलप्पदिकारम् या तमिळी महाकाव्यात सापडतो. इ. स. ९०० ते इ. स. १००० या कालावधीतील शिलालेखानुसार अनेक राजवटींचा या मंदिरावर प्रभाव दिसून येतो. चोल, पल्लव, होयसळ व विजयनगरच्या राजवटींच्या कालावधीत या मंदिराचा विस्तार होत गेला. दिल्लीच्या सुलतानांकडून इ. स. १३००मध्ये हे मंदिर नष्ट केले गेले. विजयनगरच्या राजांनी त्याची परत उभारणी केली.

कंबोडियातील अंगरकोट मंदिरानंतर या मंदिराचा मोठे मंदिर म्हणून उल्लेख केला जातॊ. या मंदिराचा परिसर १५६ एकर असून, सात मोठ्या तटबंदीतून २१ गोपुरे असलेले हे महाकाय मंदिर आहे. या मंदिराचे मुख्य गोपुर २३६ फूट उंच आहे. त्याला राजगोपुर असे संबोधले जाते. ११व्या शतकातील रामानुजस्वामींचे अनुयायी नाथमणी व यमुनाचार्य यांनी याची स्थापना केली. पुराणकथेनुसार, रावणाचा भाऊ बिभीषण अयोध्येहून परत जाताना येथे थांबला होता. ११व्या शतकातील प्रसिद्ध रामानुजस्वामी यांची येथे समाधी आहे. गर्भागृहातील विमानाचा भाग सोन्याने मढविलेला आहे. या मंदिरात देव-देवतांच्या मूर्ती, तसेच नर्तिकांची आकर्षक शिल्पे आहेत.

श्री जम्बुकेश्वरा मंदिर, तिरुवनैक्कवलश्री जम्बुकेश्वरा मंदिर, तिरुवनैक्कवल : श्री रंगनाथस्वामी मंदिराच्या पूर्वेला दोन किलोमीटर अंतरावर हे सुंदर मंदिर आहे. याचे बांधकाम इ. स. १६००मध्ये झाले. पौराणिक कथेनुसार, पार्वतीदेवीने येथे तपश्चर्या केली होती. येथे अखिलेंद्रेश्वरीचीही पूजा केली जाते. तिरुवनैक्कवल या त्रिचीच्या उपनगरातच नोबेल पुरस्कार विजेते सी. व्ही रामन यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मस्थळाला भेट देण्यासाठी अभ्यासक आवर्जून येतात.

लोर्ड चर्चलोर्ड चर्च : हे गॉथिक प्रकारातील २२० फूट उंचीचे चर्च आहे. हे चर्च १८१२ मध्ये बांधण्यात आले असे म्हणतात. ते अत्यंत सुंदर असून, त्याची वास्तुकला बघण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. चर्च भागात मार्केटही आहे.

वरैयुर : हे त्रिचनापाल्लीचे उपनगर असून, एके काली येथे चोल राजांची राजधानी होती. येथील हँडलूम साडी, हाताने बनवलेली सिगारेट आणि कॉफी प्रसिद्ध आहे.


हजरत नाथरवलीहजरत नाथरवली : त्रिचनापल्ली येथे एक हजार वर्षांपूर्वी सुफी संत हजरत नाथरवली मध्य पूर्वेतून आले. त्यांचा दर्गा एका टेकडीवर संगमरवरात बांधलेला आहे.

ग्रँड अनैकुट : दुसऱ्या शतकात चोल राजांनी कावेरी नदीवर बांधलेले हे धरण असून, ते सहलीचे एक ठिकाण झाले आहे. ते त्रिचीपासून २४ किलोमीटर अंतरावर आहे.

ग्रँड अनैकुटत्रिचनापल्ली येथे विमानतळासह आणि रेल्वे, बससेवा उपलब्ध आहे. राहण्यासाठी चांगली हॉटेल्सही आहेत. येथे भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ चांगला असतो.- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

त्रिचनापल्ली

(दक्षिण दिग्विजयातील सोनेरी पान - त्रिचनापल्ली तसेच काही आसपासच्या ठिकाणांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ramesh Atre About 159 Days ago
सुंदर फोटो, माहितीपूर्ण लेख!
0
0
जयश्री चारेकर About 231 Days ago
खूपच सुंदर माहिती 🙏
0
0
Praful Bidoo About 237 Days ago
खुप छान माहिती.
0
0
Avinash Ashirgade. About 238 Days ago
सुरेख नी विस्तृत माहिती दिलीत, धन्यवाद. दक्षीण भारताच्या पर्यटनाची आवड आधी होतीच.. आता अजुन वाढली, या पोस्ट मुळे..
0
0
M. A. K About 241 Days ago
अतिसुंदर, माहिती बरोबरच विडिओ पाहून डोळ्यांचे पारणे फिटले, thanks for the lovely pictures
0
0
जयश्री चारेकर About 241 Days ago
फारच सुंदर वर्णंन छान माहिती मिळाली
0
0
सतीश चौगुले About 242 Days ago
खूप सुंदर वर्णन
0
0
Hemant Ketkar About 242 Days ago
Nice information.
0
0
Milind Lad About 244 Days ago
Khup sundar sthala varnan. Hats off.
1
0
Anand Sanglikar About 244 Days ago
Best Place in Tamilnadu Visited 2 times & again want to visit
0
0

Select Language
Share Link