Next
नॅशनल सायबर ऑलिम्पियाडमध्ये अर्णव जाघाव प्रथम
BOI
Saturday, May 11, 2019 | 04:09 PM
15 0 0
Share this article:

अर्णव जाघावपुणे : सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनतर्फे आयोजित नॅशनल सायबर ऑलिम्पियाडमध्ये सूर्यदत्ता कनिष्ठ महाविद्यालयाच्या अर्णव जाघाव या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

त्याच्या या यशामुळे ‘सूर्यदत्ता’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तीस देशांतील १४०० शहरांतील पन्नास हजार शाळांमधून लाखो विद्यार्थ्यांनी या ऑलिम्पियाडमध्ये सहभाग घेतला होता. जगातील सर्वात मोठी स्पर्धा समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पियाडमध्ये अर्णवने यश मिळवत सूर्यदत्ता संस्थेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. 

लवकरच नवी दिल्ली येथे होणाऱ्या सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या सोहळ्यात त्याला सन्मानित केले जाणार आहे. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय बी. चोरडिया यांच्यासह व्यवस्थापन, शिक्षकवृंद आणि अर्णवचे सहकारी विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search