Next
लीला पुनावाला फाउंडेशनतर्फे मातांचा सत्कार
प्रेस रिलीज
Tuesday, March 13 | 03:03 PM
15 0 0
Share this story

 पुणे : समाजातील गरजू व प्रतिभावान मुलींना शिक्षण घेण्यास मदत करणाऱ्या लीला पुनावाला फाउंडेशनतर्फे (एलपीएफ) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सर्व लीला ज्युनियरच्या मातांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या मातांनी आपल्या मुलींना त्यांच्या पायावर उभे राहून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. या मुली भविष्यात  शिक्षण घेउन स्वावलंबी बनतील आणि  स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबालाही हातभार लावतील. 

‘संकटांचा सामना  धीराने आणि संयमाने करावा. जीवनातील प्रत्येक मार्गावर विश्वासाने चालावे’, असा सल्ला लीला पूनावाला यांनी दिला. ‘प्राचीन काळापासून ते आजतगायत भारतातील स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. कित्येकदा त्या सामाजिक शोषणाचा बळी ठरतात, त्यांना केवळ घरातच नव्हे तर समाजातही गुलाम म्हणून समजले जाते. त्यासाठी स्त्रियांनी त्यांच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हायला हवे,’ असेही त्या म्हणाल्या. 

या वेळी लीला पुनावाला, नाझुरा सत्तार, (प्राचार्या-संचालक बेल -एअर कॉलेज),लॉर्दु मेरी नागोतू( हॉस्पिटल सिस्टर)  यांना सन्मानित करण्यात आले. ज्या शाळा मुलींना मदत करतात, अशा शाळांच्या प्राचार्यांचा, फाउंडेशनचे सर्व कर्मचारी, तसेच ‘पीस अॅम्बॅसिडर’चा देखील सन्मान करण्यात आला. 

लीला ज्युनिअर्सच्या मातांसाठी आरोग्यसेवा, वैद्यकीय जागरुकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘पीस अॅम्बॅसिडर’ च्या मुलींनी  महिला समस्यांवर प्रकाश टाकणारे नाटक आणि काही गीते सादर केली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Maya Thadhani About 311 Days ago
LPF marches on doing excellent work to empower young girls & women, with Lila & Firoz leading the brigade! Warmest Congratulations on your award & the several ventures you started from 1996 onwards. Proud & Priveleged to have been a part of this wonderful Foundation.Good Luck & God Speed!
0
0
Firoz Poonawalla About 311 Days ago
Exellent coverage. Unless media gives their wholehearted support it is not possible to carry on with such a gigantic job of empowering through good education 500 million women. This force is so great that India can become 20 trillion dollars economy. Let us all join hands .
0
0

Select Language
Share Link