Next
पुण्यात ‘जंगलम् मंगलम् चविष्टम्’
आदिवासी संस्कृतीची झलक दाखविणारा विशेष कार्यक्रम
BOI
Monday, September 24, 2018 | 01:06 PM
15 0 0
Share this article:

पुणे : जंगलात राहणारे आदिवासी, त्यांची जीवनशैली, खाद्यसंस्कृती याबद्दल जाणून घ्यायचे आहे, तर मग रविवारी, ३० सप्टेंबर रोजी ‘जंगलम् मंगलम् चविष्टम्’ या अनोख्या कार्यक्रमाला हजेरी लावा. पालघर जिल्ह्यातील जवाहर तालुक्यात काम करणाऱ्या ‘वयम्’ चळवळीने पुण्यात आदिवासी नृत्य, संगीत व खाद्यसंस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून, सदाशिव पेठ येथील भावे प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम होणार आहे. 

‘‘जंगलम् मंगलम् चविष्टम्’ म्हणजे पिढ्यान् पिढ्या निसर्गाच्या निकट सहवासात बहरलेल्या वन संस्कृतीची थेट भेट घडवणारा अनोखा जलसा आहे. यामध्ये आदिम संवेदना जागवणारे तारप्याचे सूर, थिरकत्या नृत्याचा ठेका, रानमातीत वाढलेल्या भाज्यांचा अनवट गंध एकाचवेळी अनुभवता येईल. आदिवासी जीवन पद्धतीची झलक दाखवणारा हा कार्यक्रम असून, यामध्ये पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. हा कार्यक्रम सशुल्क असून, ३०० रुपये प्रति प्रवेशिका शुल्क आकारले जाईल. यामध्ये आदिवासी नृत्य, संगीत यासह रानखाद्याची चवही चाखता येईल’, अशी माहिती ‘वयम्’ चळवळीचे प्रमुख कैलास नरवडे यांनी दिली.  

‘‘वयम्’ जवाहरच्या आदिवासी पाड्यांमध्ये गेली १० वर्ष कार्यरत आहे. आदिवासी समाजाला सक्षम करत स्वतःचे हक्क स्वतः मिळविणेसाठी संघटित आणि सबळ करण्याचे काम ‘वयम्’ चळवळ करते. रोजगार हमी योजना ते पेसा कायदा अशा वेगवेगळ्या कायद्यांचे प्रशिक्षण घेऊन शासन दरबारी आपले म्हणणे पोहोचवण्यासाठी अनेक लोक तयार झाले आहेत. अशाच काही महिला आणि पुरुष यांना एकत्र आणून तिथल्या संस्कृतीच्या श्रीमंतीची पुणेकरांना ओळख व्हावी आणि काही गोष्टींमध्ये हा समाज किती श्रीमंत,पुढारलेला आहे याची ओळख व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे’, असे या ‘वयम्’चे सचिव मिलींद थत्ते यांनी सांगितले. 

कार्यक्रमाविषयी 
आदिवासी संस्कृतीची झलक दाखविणारा कार्यक्रम 
‘वयम्’तर्फे जंगलम् मंगलम् चविष्टम्  
स्थळ : भावे प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ, पुणे  
वेळ : रविवार, ३० सप्टेंबर.
शुल्क : ३००/- रुपये. 
संपर्क : कैलास नरवडे : ९६०४५ ३३९१९
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 78 Days ago
Excellent idea . Hope , the response is equally . Look foreard to further report .
0
0

Select Language
Share Link
 
Search