Next
आयसीआयसीआय बँकेतर्फे लष्कराला दहा कोटी
प्रेस रिलीज
Monday, October 09 | 05:37 PM
15 0 0
Share this story

आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि सीईओ  चंदा कोचर यांनी संरक्षण मंत्री  निर्मला सीतारामन् यांच्याकडे मदतीचा पहिला धनादेश सुपूर्द केला.

नवी दिल्ली : देशासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबियांसाठीच्या कल्याणकारी उपक्रमांकरिता आयसीआयसीआय बँकेने भारतीय लष्करी दलाला दहा कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी आणि पुढच्या वर्षी अशा दोन टप्प्यात ही रक्कम देण्यात येणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि सीईओ  चंदा कोचर यांनी रक्षा मंत्रालयात संरक्षण मंत्री  निर्मला सीतारामन् यांच्याकडे आज या मदतीचा पहिला, ५ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. 

या वेळी आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि सीईओ श्रीमती चंदा कोचर म्हणाल्या, ‘भारतीय लष्करी दल शूरपणाने आपल्या सीमांचे आणि आपले संरक्षण करत असते. यापैकी अनेक वीर प्राणपणाने लढले आहेत आणि आपल्या देशासाठी प्राणांचे बलिदानही दिले आहे. त्यांच्या कुटुंबियांचे नुकसान खरे तर अशा कुठल्याही रकमेने भरून येणारे नाही, परंतु त्यांच्या स्वस्थतेसाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. याद्वारे सैनिकांची मुले आणि विधवा पत्नी यांना शिक्षणासाठी मदत  करण्यात येणार आहे ; तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी आणि त्यांच्या पुढील शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी खर्च केला जाईल. दुसऱ्या योजनेत माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी वित्तीय मदत पुरवली जाईल.'
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link