Next
भारतीय विद्या भवनमध्ये बुधवारी नृत्योत्सवाचे आयोजन
BOI
Friday, August 23, 2019 | 06:00 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या  वतीने बुधवार, दि. २८ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता नृत्योत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे येथील लोकरंग सांस्कृतिक मंच हा कार्यक्रम सादर करणार असून, नृत्य रचनांसह, पारंपरिक जागरण, गोंधळ यांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. या वेळी सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे,’ अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली. 

‘भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात हा महोत्सव होणार असून, या कार्यक्रमात सुखदा खांडगे आणि सहकलाकार नृत्य सादर करणार आहेत, तर श्रीकांत रेणके आणि साथी जागरण, गोंधळ सादर करणार आहेत या वेळी कथक गुरु नंदकिशोर कपोते, लावणी कलाकार राजश्री नगरकर आणि ज्येष्ठ लोककला कलाकार माणिकबाई रेणके यांचा ‘अशोकजी परांजपे’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे,’ असेही काकिर्डे यांनी सांगितले. 

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search