Next
हर्ष भोगले, रॉजर बिन्नी
BOI
Thursday, July 19, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

जगप्रसिद्ध समालोचक आणि क्रीडापत्रकार हर्ष भोगले आणि अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांचा १९ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
...
हर्ष भोगले

१९ जुलै १९६१ रोजी हैद्राबादमध्ये जन्मलेला हर्ष भोगले हा जगभरच्या क्रीडारसिकांना माहीत झालेला भारतीय समालोचक आणि क्रीडापत्रकार! विशेषतः क्रिकेटवेड्या दर्शकांना तो ओळखीचा झाला ते १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रलिया दौऱ्यापासून. मूळचा केमिकल इंजिनियर (बी. टेक.) आणि अहमदाबादच्या ‘आयआयएम’चा पदवीधर असणाऱ्या हर्षने राज्यपातळीवर क्रिकेट खेळलं होतं. सुरुवातीला अॅडव्हर्टायझिंग कंपनीत नोकरी करून झाल्यावर त्याने क्रीडा समालोचकाचा व्यवसाय निवडला आणि एबीसी, ईएसपीएन, स्टार स्पोर्टस् आणि ‘बीबीसी’सारख्या प्रख्यात कंपन्यांच्या समालोचकांच्या चमूमध्ये तो आता मानाचं स्थान पटकावून आहे. ‘दी विनिंग वे’ आणि ‘आउट ऑफ दी बॉक्स’ ही त्याची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
........

रॉजर बिन्नी 

१९ जुलै १९५५ रोजी बेंगळुरूमध्ये जन्मलेला रॉजर बिन्नी हा १९८०च्या दशकातला भारताचा विशेष लक्षवेधी अष्टपैलू खेळाडू म्हणून गाजला होता. उपयुक्त फलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि बऱ्यापैकी चालणारी गोलंदाजी यांमुळे तो संघासाठी उपयोगी खेळाडू ठरला होता. विशेषतः १९८३चा इंग्लंडमधला वर्ल्डकप (१८ बळी) आणि १९८५ सालची ऑस्ट्रेलियामधली वर्ल्डसीरिज (१७ बळी) त्याने आपल्या गोलंदाजीने गाजवली होती. भारतासाठी सामना वाचवण्यासाठी त्याने बऱ्याचदा एका बाजूने टिकून राहून फलंदाजीतली जबाबदारीही पार पाडली होती. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसीएशनचा पदाधिकारी म्हणून तो काम पाहतो. 
.......

यांचाही आज जन्मदिन :
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर (जन्म : १९ जुलै १९३८) 
(त्यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search