Next
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये १२ जुलैला आयडिया लॅबचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Thursday, July 11, 2019 | 04:05 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील एस. एम. जोशी कॉलेजमध्ये नव्याने विकसित करण्यात आलेल्या आयडिया लॅबचे उद्घाटन १२ जुलैला सकाळी ११.३० वाजता होणार आहे. 

या संदर्भात एस. एम. जोशी कॉलेज आणि ट्रान्सफिनाइट इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला असून, या कंपनीने आय लॅब हे अॅप विकसित केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना व कल्पनांना या अॅपच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळणार आहे. त्यातून त्यांना पेटंटही मिळू शकते. 

या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान वैज्ञानिक डॉ. उल्हास खरुल भूषविणार असून, या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैज्ञानिक डॉ. भारत काळे, तसेच डॉ. ए. बी. आडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, सतीश जावळे, दीपक वाणी, आशुतोष कुलकर्णी, अशोक तुपे, चेतन तुपे, दिलीप तुपे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी दिली.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search