Next
‘२०१८ होंडा आफ्रिका ट्विन’ची नोंदणी सुरू
प्रेस रिलीज
Thursday, June 07, 2018 | 01:55 PM
15 0 0
Share this article:

गुरगाव : होंडा मोटारसायकल अॅंड स्कूटर प्रायव्हेट लिमिटेडने ‘आफ्रिका ट्विन २०१८’साठीची नोंदणी सुरू झाली असल्याची घोषणा केली. या नोंदणीमधील नशीबवान ग्राहकांना ‘मोटोजीपी’मध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या लाडक्या मोटाररायडर्सना पाहण्याची संधी मिळणार आहे.

ही नोंदणी फक्त पहिल्या ५० नशीबवान ग्राहकांसाठी मर्यादित राहणार आहे. या नोंदणीसाठी ग्राहक भारतामधील २२ शहरांमधील ‘होंडा’च्या विक्री आणि सेवा विभागाशी संपर्क साधू शकतात. ‘२०१८ होंडा आफ्रिका ट्वीन’ ही मोटारसायकल पहिल्यांदा ‘ऑटो एक्स्पो २०१८’च्या प्रदर्शनात सादर करण्यात आली होती. या मोटारसायकलला तीन दशकांची ‘होंडा’ची परंपरा लाभली आहे. शक्ती, आराम आणि नियंत्रण अशा तीनही सुविधा या मोटारसायकलमध्ये एकत्रित पाहायला मिळतात.

भारतीय मोटारसायकलिंग क्षेत्रामध्ये नवीन क्रांती घडविणाऱ्या ‘२०१८ आफ्रिका ट्विन’बद्दल ‘होंडा मोटारसायकल अॅंड स्कूटर इंडिया प्रा. लि.’चे विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘ज्या मोटारसायकलची प्रतीक्षा ग्राहकांना होती, ती ‘आफ्रिका ट्विन’ आता भारतीय ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहे. नवीन वैशिष्ट्यांसह ही मोटारसायकल ग्राहकांना आनंद देणार आहे. ही मोटारसायकल अत्यंत विश्वासार्ह, व्हर्सटाइल आणि साहसी प्रवासासाठी योग्य आहे. काही नशीबवान ग्राहकांना आपल्या लाडक्या मोटाररायडर्सना ‘मोटोजीपी’मध्ये लाइव्ह पाहण्याची संधी मिळणार आहे.’

इलेक्ट्रॉनिक्स ओव्हरहॉल, नियंत्रणात वाढ, सुट युवरसेल्फ रायडिंग मोड्स, टूर, अर्बन. ग्राव्हेल, वाढीव कार्यप्रणाली अल्युम्युनियम स्विंग आर्म गॅसचार्जित डॅम्परसह, हायड्रॉलिक डायल स्टाइल प्री लोड अॅडजस्टर आणि रिबाउंड डॅम्पिंग अॅडजस्टमेंट, २२० एमएम रीअर व्हील प्रवास ही ‘२०१८ आफ्रिका ट्विन’ची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. ३६० डिग्री व्हॅल्यू अॅडिशनमुळे ‘२०१८ आफ्रिका ट्वन’ची किंमत १३ लाख २३ हजार रुपये (एक्स शोरूम दिल्ली) एवढी ठेवण्यात आली आहे. ही मोटारसायकल जीपी लाल रंगात उपलब्ध आहे.

भारतामधील ‘आफ्रिका ट्विन’ :
जुलै २०१७ मध्ये ही मोटारसायकल भारतात सादर करण्यात आली. ‘ड्युएल क्लच ट्रान्समिशन’ (डीसीटी) तंत्रामुळे देशभरातील ग्राहकांना या मोटारसायकलने भुरळ घातली. यापूर्वीचे सगळे ठराविक मापदंड तोडीत अवघ्या १०० दिवसांमध्ये ८० वाहने विकली गेली.

अधिक माहितीसाठी वेबसाइट : Honda2WheelersIndia.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search