Next
‘धनिकांनी समाजहितासाठी पैसे खर्च करण्याची गरज’
प्रेस रिलीज
Saturday, May 05 | 05:37 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘समाजातील धनिक लोकांनी समाजहिताच्या कामासाठी पैसे खर्च केले पाहिजेत. मुकुल माधव फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया आणि व्यवस्थापकीय विश्‍वस्त रितू छाब्रिया यांनी ‘सीएसआर’अंतर्गत निधी उपलब्ध करून देऊन नवजात अर्भकांसाठी दोन अतिदक्षता विभाग उभारून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. इतर धनिकांनी यातून प्रेरणा घेत समाजहितासाठी योगदान द्यावे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीष बापट यांनी केले.

मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकारामुळे या दोन अतिदक्षता विभागांद्वारे नवजात अर्भकांना जीवनदान मिळण्यास मोलाची मदत होणार असल्याचेही बापट यांनी सांगितले. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन यांच्या पुढाकाराने येरवडा येथील स्व. भारतरत्न राजीव गांधी रुग्णालय आणि भवानी पेठेतील चंदुमामा सोनावणे प्रसृतीगृह येथे नवजात अर्भकांसाठी दोन अतिदक्षता विभाग उभारण्यात आले आहेत. या विभागाचे उद्घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर चंदुमामा सोनावणे हॉस्पिटल येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार जगदीश मुळीक, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी आयुक्त कुणालकुमार, ‘मुकुल माधव’चे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया, रितू छाब्रिया, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, डॉ. अंजली साबणे, नगरसेविका अर्चना पाटील, नगरसेवक अविनाश बागवे आदी उपस्थित होते.

बापट म्हणाले, ‘योग्य आणि वेळेत उपचार न मिळाल्यामुळे नवजात अर्भकांचा मृत्यू होतो. आर्थिक परिस्थिती नसलेले सर्वसामान्य लोक दवाखान्यात भरण्यास पैसे नसल्यामुळे दवाखान्यात येण्यास घाबरतात. परिणामी गर्भवती स्त्री किंवा नवजात अर्भकाला उपचाराअभावी मृत्यूला सामोरे जावे लागत होते. योग्य उपचार न मिळाल्यामुळे वर्षाला सहा हजार बालकांचा मृत्यू होत होता. अलीकडे हेच प्रमाण अडीच हजारांवर आले आहे. आता मात्र मुकुल माधव फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता विभागामुळे सर्वसामान्यांना अगदी अल्पदरात किंवा मोफत उपचार मिळतील; मात्र पैशांअभावी कुणाचाही अडवणूक केली जाऊ नये. इथे येणार्‍या प्रत्येक रुग्णाला चांगली वागणूक मिळेल, रुग्णाची हेळसांड होऊ न देण्याची जबाबदारी डॉक्टर, नर्सेस तसेच हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या सर्वांनी घ्यावी.’

महापौर टिळक म्हणाल्या, ‘मुकुल माधव फाउंडेशनने उभारलेल्या अर्भकांसाठीच्या अतिदक्षता विभागामुळे अल्प दरात उपचार मिळणे शक्य होणार आहे. स्वत: मॉनिटरिंग करून प्रकाश छाब्रिया यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.’

प्रकाश छाब्रिया म्हणाले, ‘प्रेम व पैसा दुसर्‍यासाठी खर्च केला तर त्यामध्ये अधिकाधिक प्रगती होत जाते, अशी आई-वडीलांची शिकवण आहे. सर्वांचे सहकार्य मिळाल्याने रितू हे काम करू शकली.’

डॉ. अंजली साबणे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link