Next
‘स्वातंत्र्यवीरायण’च्या सादरीकरणाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
BOI
Monday, April 24, 2017 | 11:10 AM
15 2 0
Share this article:

माजी खासदार प्रदीप रावत यांनी प्रयोगाला उपस्थित राहून युवा कलाकारांना  प्रोत्साहन दिलेपुणे : ‘स्वातंत्र्यवीरायण’ या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जीवनगाथेवरील नाटकाचे पुण्यातील युवा रंगकर्मींनी केलेले सादरीकरण नुकतेच पार पडले. या सादरीकरणाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध युवा कलाकार अथर्व कर्वे याने दिग्दर्शित केलेल्या या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग भरत नाट्य मंदिर येथे नुकताच झाला. 

या प्रयोगाला माजी खासदार प्रदीप रावत, प्रतिभा शाहू मोडक, सुनील महाजन, दीपक बीडकर, ‘नूमवि’ प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे, निर्माते डॉ. डी. एन. गुंडेवार, स्वप्नील फुगे, अरविंद कोटस्थाने आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. 

नाटकातील एक क्षण‘नूमवि’च्या वतीने मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे यांनी अथर्व कर्वे याचा सत्कार केला.  या वेळी इतर कलाकारांचाही  सत्कार करण्यात आला. नाटकाचे लेखक अथर्व देशपांडे शार्दूल अनसिंगकर असून, दिग्दर्शन अथर्व कर्वे याने केले आहे. डॉ. डी. एन. गंजेवार हे नाटकाचे निर्माते आहेत. 

अथर्व कर्वे, ऐश्वर्या तुपे, आदित्य बीडकर, पूर्वा देशपांडे, ऋत्विक व्यास, अमित कुलकर्णी, सोहम देवधर, पार्थ कुलकर्णी, राजस कुलकर्णी यांच्या भूमिका या नाटकात आहेत. नेपथ्य सोनम चव्हाण यांचे असून, वेशभूषा पूर्वा देशपांडे यांनी केली आहे. 

या नाटकाचा पुढील प्रयोग पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ३० एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
 
15 2 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search