Next
निकालः मतमोजणीला सुरुवात, भाजपच्या बाजूने कल
प्रभात
Thursday, February 23, 2017 | 10:33 AM
15 0 0
Share this article:



राज्यात 16 आणि 21 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. याचे निकाल आज जाहीर होणार आहेत. राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांसाठी घेण्यात आले होते.


झेडपी आणि पंचायत समितीचा निकाल काही तासातच?


सकाळी 10 वाजल्यापासून महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी मतमोजणी सुरू होणार आहे. साधारणपणे एका जिल्हा परिषद गटात 20 हजार मतदार असतात. एका गटात दोन पंचायत समिती उमेदवार आहेत. एकूण मतदानापैकी सुमारे 70 टक्के मतदान झाल्याने, एका गटाचा निकाल येण्यासाठी 14 हजार मतांची मोजणी केली जाणार आहे. यासाठी साधारणपणे दीड तासांचा वेळ लागू शकतो. म्हणजे सकाळी 11 वाजेपर्यंत झेडपी व पंचायत समित्यांचे बरचसं चित्र स्पष्ट झालेले असेल.


10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अंदाजे सरासरी 56.30 तर 11 जिल्हापरिषद आणि 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69 .43 टक्के मतदान झाले आहे.


महानगरपालिकांच्या 1 हजार 268 जागांसाठी 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत.


जिल्हा परिषदेच्या 654 जागांसाठी 2 हजार 956 ; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 5 हजार 267 उमेदवारांमध्ये लढत होत आहे.


रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्हा परिषदांचा आज निकाल लागणार आहे. तसेच बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिकांचेही निकाला आजच स्पष्ट होणार आहेत.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search