Next
‘गोगटे-जोगळेकर’मध्ये तीन ऑगस्टला ‘मैत्र’चे आयोजन
मैत्रीच्या माध्यमातून विद्यार्थी आणि नामवंत मंडळी साधणार एकमेकांशी संवाद
BOI
Friday, July 19, 2019 | 11:59 AM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : चतुरंग प्रतिष्ठान आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मैत्र’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तीन ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत महाविद्यालयातील राधाबाई शेट्ये सभागृहात होईल.

हा कार्यक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच असून, जागेअभावी सहभागींच्या संख्येवर मर्यादा पडणार आहे. पूर्णतः विनामूल्य प्रवेश असलेल्या या कार्यक्रमाच्या प्रवेशिका डिपॉझिट पद्धतीने २३ ते २५ जुलैदरम्यान सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेतच राधाबाई शेट्ये सभागृहाच्या प्रवेशद्वारी वितरीत केल्या जाणार आहेत. या विशेष कायर्क्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अधिक प्राधान्य दिले जाणार असून, नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र बरोबर ठेवणे आवश्यक आहे. 

‘मैत्र’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीतकार अशोक पत्की, संगणकतज्ज्ञ व संगीततज्ज्ञ अच्युत गोडबोले, दिग्दर्शक-अभिनेता आलोक राजवाडे, पत्रकार आणि संवादक-मुलाखतकार सुधीर गाडगीळ, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पोर्ट्रेट पेंटर सुहास बहुळकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रसाद देवधर, नृत्यांगना आणि नृत्यगुरू सोनिया परचुरे आणि कोकणातील प्रथितयश चित्रकार अरुण दाभोलकर यांची उपस्थिती लाभणार आहे. या ‘मैत्र’ मेळाव्यात मान्यवरांसोबत थेट भेटीची, आमने-सामने गप्पागोष्टी करण्याची, तसेच  त्यांच्याबरोबर चहापान करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थी आणि नामवंत मंडळींमध्ये घडणाऱ्या मनमोकळ्या प्रश्नोत्तरांतून, गप्पागोष्टींतून ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने त्यांच्यात नवे ‘मैत्र’ जडावे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.

या संदर्भातील अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या नोटीसबोर्ड लवकरच तपशीलवार पत्रक लावण्यात येणार असून, या कार्यक्रमाला येण्यास इच्छुक असणाऱ्या लवकरात लवकर नावनोंदणी करण्याचे आवाहन गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि चतुरंग प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search