Next
गणेशोत्सवात संगीत कार्यक्रमांतून पूरग्रस्तांसाठी निधी; ओम साई मित्रमंडळाचा उपक्रम
BOI
Tuesday, August 20, 2019 | 06:05 PM
15 1 0
Share this article:

रत्नागिरी : रत्नागिरीतील ओम साई मित्रमंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने संस्थेने प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांची संगीत रजनी, ‘संत गोरा कुंभार’ हे संगीत नाटक आणि राहुल सक्सेना व रसिका गानू यांचा ‘स्वराशिष’ हा ऑर्केस्ट्रा हे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांच्या सन्मानिकांद्वारे उभा राहणारा निधी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून खर्च केला जाणार आहे. 

ओम साई मित्रमंडळातर्फे नुकतीच पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय श्री कॅरम स्पर्धा, दोन अंकी सामाजिक नाटक आणि २०० वारकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते; मात्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीचे भान ठेवून हे कार्यक्रम संस्थेने रद्द केले. त्याऐवजी संगीतविषयक तीन वेगळे कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या तिकिटांच्या विक्रीतून पूरग्रस्तांसाठी निधी उभारण्याचे संस्थेने ठरवले आहे. 

‘पूरग्रस्तांनी जे गमावले, ते पुन्हा आणणे शक्य नाही; मात्र त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी हातभार लावण्याचे काम अनेकांनी हाती घेतले आहे. त्यात आमचा हा खारीचा वाटा आहे,’ अशी भूमिका संस्थेतर्फे मांडण्यात आली आहे. जास्तीत जास्त कुटुंबांनी प्रत्येक कार्यक्रमाच्या किमान दोन देणगी सन्मानिका घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन्मानिकांसाठी संपर्क : गौरांग आगाशे - ९७३०३ १०७९९

कार्यक्रमांचा तपशील :


आठ सप्टेंबर २०१९ :
प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचा भक्तिगीत व नाट्यगीतांचा कार्यक्रम - संगीत रजनी नऊ सप्टेंबर २०१९ :
राज्य संगीत नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेले, राधाकृष्ण कला मंच प्रस्तुत संगीत नाटक - संत गोरा कुंभार१० सप्टेंबर २०१९ :
प्रसिद्ध गायक राहुल सक्सेना आणि प्रसिद्ध गायिका रसिका गानू यांचा हिंदी व मराठी गीतांचा ऑर्केस्ट्रा - स्वराशिष 

(सर्व कार्यक्रम रात्री नऊ वाजता रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणार आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search