Next
१७व्या लोकसभेत विक्रमी ७८ महिला खासदार
७२४ महिला उमेदवारांनी लढवली होती लोकसभा निवडणूक
BOI
Saturday, May 25, 2019 | 02:04 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : राजकारणात महिलांचा टक्का वाढताना दिसत असून, नुकत्याच झालेल्या १७व्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल ७२४ महिला उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते; त्यापैकी ७८ जणींना खासदारपदाची संधी मिळाली आहे. लोकसभेतील महिला खासदारांची ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. त्यापैकी ४१ महिलांनी या आधीही खासदारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. १६व्या लोकसभेत ६४ महिला खासदार होत्या. 

 

(पहिल्या लोकसभेपासून १७व्या लोकसभेपर्यंत प्रत्येक वेळी किती महिला खासदार निवडून आल्या होत्या, हे वरील आलेखात पाहता येईल.) यंदा काँग्रेसने सर्वाधिक ५४ महिला उमेदवारांना संधी दिली होती; मात्र त्यापैकी सोनिया गांधींसह सहा महिलांनीच निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्याखालोखाल, भारतीय जनता पक्षाने ५३ महिला उमेदवारांना संधी दिली होती. त्यापैकी ४० जणींनी विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ एका महिलेला म्हणजे सुप्रिया सुळेंना उमेदवारी दिली होती. त्या बारामतीतून निवडून आल्या आहेत. बहुजन समाज पक्षाने २४, तृणमूल काँग्रेसने २३, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १०, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने चार, आम आदमी पक्षाने एका महिलेला उमेदवारी दिली होती. अपक्ष महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय होती. तब्बल २२२ अपक्ष महिला उमेदवारांनी ही निवडणूक लढवली. 

चार तृतीयपंथी व्यक्तींनीही निवडणूक लढवली होती. त्यात आम आदमी पक्षाच्या एका उमेदवाराचा समावेश होता. महिला उमेदवारांमध्ये २५ ते ५० वर्षे वयोगटातील ५३१, तर ५१ ते ८० वर्षे गटातील १८० उमेदवारांचा समावेश होता. ८० वर्षांहून अधिक वयाच्या एका महिलेनेही निवडणूक लढवली, तर २५ वर्षांहून कमी वय असणाऱ्या एका महिला उमेदवारालाही संधी मिळाली. २६ निरक्षर आणि ३६ नवसाक्षर महिलांचाही यात समावेश होता.  


निवडून आलेल्या महिला खासदारांमध्ये भाजपच्या सर्वाधिक ४० महिला उमेदवारांचा समावेश आहे. कॉंग्रेसच्या सहा, तृणमूल कॉंग्रेसच्या नऊ, बिजू जनता दलाच्या पाच, वायएसआर काँग्रेसच्या चार, द्रमुकच्या दोन, बसप, जनता दल संयुक्त, राष्ट्रवादी कॉंग्रेस, अपना दल, एलजेपी, समाजवादी पार्टी, शिवसेना, टीआरएस, एनपीपी यांच्या प्रत्येकी एक आणि दोन अपक्ष अशा एकूण ७८ महिला निवडून आल्या आहेत.

यामध्ये सर्वाधिक १२ महिला खासदार पश्चिम बंगालच्या असून, त्याखालोखाल उत्तर प्रदेशमधून ११, तर महाराष्ट्रातून आठ महिला खासदार निवडून आल्या आहेत. हेमा मालिनी सर्वांत श्रीमंत उमेदवार असून, स्मृती इराणी यांनी गांधी घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केल्याने त्यांची नावे चर्चेत आहेत.  

महाराष्ट्रातून ६१ महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यापैकी आठ जणींना विजय मिळाला आहे. डॉ. भारती पवार आणि नवनीतकौर राणा या दोन नवीन चेहऱ्यांची भर पडली आहे. यंदा निवडणूकीत महिला उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढाई झाल्याचे दिसून आले. अॅड. चारुलता टोकस, उर्मिला मातोंडकर, कांचन कुल, प्रिया दत्त आणि अंजली यांनी प्रतिस्पर्धी महिला उमेदवारांना चुरशीची टक्कर दिली. 

महिला सबलीकरण आणि महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी निवडून आलेल्या महिला खासदार प्रयत्न करतील, अशी अपेक्षा महिला वर्गाकडून व्यक्त होत आहे. 

निवडून आलेल्या सर्व महिला खासदारांची यादी येथे देत आहोत. 

नवनिर्वाचित महिला खासदार

यांना पराभूत केले...

मतदारसंघ

महाराष्ट्र

 

 

पूनम महाजन (भाजप)

 प्रिया दत्त, काँग्रेस

उत्तर-मध्य मुंबई

डॉ. हीना गावित (भाजप)

अॅड. के. सी. पाडवी, काँग्रेस

नंदुरबार

रक्षा खडसे (भाजप)

डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस

रावेर

डॉ. भारती पवार (भाजप)

धनराज महाले, राष्ट्रवादी काँग्रेस

दिंडोरी

डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)

बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस

बीड

भावना गवळी (शिवसेना)

माणिकराव ठाकरे, काँग्रेस 

यवतमाळ-वाशिम

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस)

कांचन कुल,भाजप

बारामती

नवनीतकौर राणा (अपक्ष)

आनंदराव अडसूळ, शिवसेना

अमरावती

गुजरात

 

 

शारदाबेन पटेल (भाजप)

ए. जे. पटेल, काँग्रेस

मेहसाणा

पूनमबेन मादाम (भाजप)

मुलुभाई कांदोरिया, काँग्रेस

जामनगर

रंजनाबेन भट्ट (भाजप)

प्रशांत पटेल काँग्रेस

बडोदा

दर्शना जर्दोश (भाजप)

अशोक पटेल, काँग्रेस

सुरत

डॉ. भारतीबेन शियाल (भाजप)

मनहरभाई पटेल, काँग्रेस

भावनगर

गीताबेन राठवा (भाजप)

रणजितसिंह राठवा, काँग्रेस

छोटा उदयपूर

मध्य प्रदेश

 

 

रिती पाठक (भाजप)

अजय अर्जुन सिंह, काँग्रेस

सिधी

संध्या रे (भाजप)

देवाशिष, काँग्रेस

भिंड

हिमाद्री सिंह (भाजप)

प्रमिला सिंह, काँग्रेस

शहडोल

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (भाजप)

दिग्विजयसिंह, काँग्रेस

भोपाळ

राजस्थान

 

 

रंजिता कोली (भाजप)

अभिजितकुमार जाटव, काँग्रेस

भरतपूर

दिया कुमारी (भाजप)

देवकीनंदन, काँग्रेस

राजसमंद

जसकौर मीना (भाजप)

सविता मीना, काँग्रेस

दौसा

उत्तर प्रदेश

 

 

स्मृती इराणी (भाजप)

राहुल गांधी, काँग्रेस

अमेठी

हेमा मालिनी (भाजप)

कुंवर नरेंद्र सिंह, राष्ट्रीय लोकदल

मथुरा

मनेका गांधी (भाजप)

चंद्रभद्रसिंह, बसप

सुलतानपूर

डॉ. संघमित्रा मौर्य (भाजप)

धर्मेंद्र यादव, सप

बदायूं

डॉ. रीटा बहुगुणा-जोशी (भाजप)

राजेंद्रसिंह पटेल, सप

अलाहाबाद

रेखा वर्मा (भाजप)

अर्शद इलियास सिद्दीकी, बसप

धौरहरा

साध्वी निरंजन ज्योती (भाजप)

सुखदेव प्रसाद वर्मा, बसप

फतेहपूर

अनुप्रिया पटेल (अपना दल)

रामचरित्र निशाद, सप

मिर्झापूर

सोनिया गांधी (काँग्रेस)

दिनेशप्रताप सिंह, भाजप

रायबरेली

संगीता आझाद (बसपा)

नीलम सोनकर, भाजप

लालगंज

चंडीगड

 

 

किरण खेर (भाजप)

पवनकुमार बन्सल, काँग्रेस

चंडीगड

पश्चिम बंगाल

 

 

शताब्दी रॉय (तृणमूल काँग्रेस)

दूधकुमार मोंडल, भाजप

बीरभूम

मिमी चक्रवर्ती (तृणमूल काँग्रेस)

अनुपम हज्रा, भाजप

जादवपूर

प्रतिमा मोंडल (तृणमूल काँग्रेस)

डॉ. अशोक कांदरी, भाजप

जॉयनगर

नुसरत जहाँ रुही (तृणमूल काँग्रेस)

सयान्तन बसू, भाजप

बसीरहाट

सजदा अहमद (तृणमूल काँग्रेस)

जॉय बॅनर्जी, भाजप

उलुबेरिया

महुआ मोईत्रा (तृणमूल काँग्रेस)

कल्याण चौबे, भाजप

कृष्णनगर

अप्रूपा पोद्दार (तृणमूल काँग्रेस)

तपनकुमार रे, भाजप

आरामबाग

डॉ. काकोली घोषदोस्तीदार (तृणमूल काँग्रेस)

मृणालकांती देवनाथ, भाजप

बरसात

माला रॉय (तृणमूल काँग्रेस)

चंद्रकुमार बोस, भाजप

कोलकाता दक्षिण

लॉकेट चटर्जी (भाजप)

डॉ. रत्ना डे, तृणमूल काँग्रेस

हुगळी

देबश्री चौधरी (भाजप)

कन्हैयालाल अगरवाल, तृणमूल काँग्रेस

रायगंज

सुकांता मजुमदार, भाजप

अर्पिता घोष, तृणमूल काँग्रेस

बलूरघाट

उत्तराखंड

 

 

माला राज्यलक्ष्मी शहा (भाजप)

प्रीतम सिंह, काँग्रेस

टिहरी गढवाल

त्रिपुरा

 

 

प्रतिमा भौमिक (भाजप)

सुबल भौमिक, काँग्रेस

त्रिपुरा पश्चिम

तमिळनाडू

 

 

के. कनिमोळी (द्रमुक)

डॉ. तमिलीसाई सौंदरराजन

थुथुक्कुडी

थामिझाची थांगपंडियन (द्रमुक)

डॉ. जे. जयवर्धन, अण्णा द्रमुक

चेन्नई दक्षिण

एस. ज्योतिमणी (काँग्रेस)

एम. तंबीदुराई अण्णा द्रमुक

करूर

आंध्र प्रदेश

 

 

वांगा गीता विश्वनाथ (वायएसआरसीपी)

सुनील चालमलशेट्टी (तेलुगू देसम पक्ष)

काकीनाडा

डॉ. बी. व्ही. सत्यवती (वायएसआरसीपी)

आनंदकुमार अडारी (तेलुगू देसम पक्ष)

अनकापल्ली

चिंता अनुराधा (वायएसआरसीपी)

हरीश मधुर गंती (तेलुगू देसम पक्ष)

अमलापुरम

गोद्देती माधवी (वायएसआरसीपी)

किशोरचंद्र देव (तेलुगू देसम पक्ष)

अरुकू

आसाम

 

 

क्वीन ओझा (भाजप)

बबिता शर्मा, काँग्रेस

गुवाहाटी

बिहार

 

 

वीणा देवी (लोकजनशक्ती पक्ष)

रघुवंश प्रसाद सिंह, राजद

वैशाली

रमा देवी (भाजप)

सय्यद फैझल अली, राजद

शिवहर

कविता सिंह (संयुक्त जनता दल)

हीना शहाब, राजद

सिवान

हरियाणा

 

 

सुनीता दुग्गल (भाजप)

अशोक तन्वर, काँग्रेस

सिरसा

झारखंड

 

 

अन्नपूर्णा देवी (भाजप)

बाबूलाल मरांडी, झामुमो

कोडर्मा

गीता कोरा (काँग्रेस)

लक्ष्मण गिलुआ, भाजप

सिंहभूम

कर्नाटक

 

 

सुमालथा अंबरीश (अपक्ष)

निखिल कुमारस्वामी, धर्मनिरपेक्ष जनता दल

मंड्या

शोभा करंदलाजे (भाजप)

प्रमोद मध्वराज, धर्मनिरपेक्ष जनता दल

उडुपी चिकमंगळूर

केरळ

 

 

रम्या हरिदास (काँग्रेस)

डॉ. पी. के. बिजू, माकप

अलथूर

मेघालय

 

 

अगाथा संगमा (एनपीपी)

डॉ. मुकुल संगमा, काँग्रेस

तुरा

ओडिशा

 

 

संगीता देव (भाजप)

कलिकेश नारायण सिंह देव, बिजू जनता दल

बोलांगिर

राजश्री मलिक (बिजू जनता दल)

बाभूप्रसाद तराई, भाजप

जगतसिंहपूर

मंजूलता मंडल (बिजू जनता दल)

अभिमन्यू सेठी, भाजप

भद्रक

शर्मिष्ठा सेठी (बिजू जनता दल)

अमिया मलिक, भाजप

जाजपूर

प्रमिला बिसोयी (बिजू जनता दल)

अनिता सुभादर्शिनी, भाजप

आस्का

चंद्राणी मुर्मू (बिजू जनता दल)

अनंता नायक, भाजप

क्योंझर

अपराजिता सारंगी (भाजप)

अरूप मोहन पटनाईक, बिजू जनता दल

भुवनेश्वर

पंजाब

 

 

प्रेणित कौर (काँग्रेस)

सुरजितसिंग राखरा, शिरोमणी अकाली दल

पतियाळा

हरसिम्रतकौर बादल (शिरोमणी अकाली दल)

अमरिंदरसिंग, काँग्रेस

भटिंडा

तेलंगण

 

 

कविता मालोथू (टीआरएस)

बलराम नाईक पोरिका, काँग्रेस

महबूबाबाद

छत्तीसगड

 

 

ज्योत्स्ना महंत (काँग्रेस)

ज्योतीनंद दुबे, भाजप

कोरबा

रेणुका सारुता (भाजप)

खेलसाई सिंह, काँग्रेस

सरगुजा

गोमती (भाजप)

ललजितसिंह रथिया, काँग्रेस

रायगड

 


देशभरातील सर्व खासदारांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

महाराष्ट्रातील खासदारांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search