Next
चला, ‘मान्सून फेस्टिव्हल’ला जाऊ या
BOI
Friday, May 19, 2017 | 04:07 PM
15 1 0
Share this story

मुंबई : पावसाळा अनुभवावा तर तो कोकणातला. हिरवीगार भातशेती, कडेकपारीतून कोसळणारे धबधबे, कोकणातील छोटी छोटी खेडी, डोंगरांनी पांघरलेले हिरवे गालिचे मन तृप्त करतात आणि अस्सल कोकणी चवीचे जेवण रसनेला तृप्त करते. 

पावसाळ्यातील कोकण अनुभवता येण्यासाठी ‘कोकण ग्रीनलाइफ हॉस्पिटलिटी’तर्फे दर वर्षी खास ‘मान्सून फेस्टिव्हल’चे आयोजन केले जाते. शुभ्र धबधबे, नेचर ट्रेल, गावांचा फेरफटका, फार्म हाउसमधील वास्तव्य आणि कोकणी पद्धतीने तयार केलेल्या सुग्रास जेवणाची मेजवानी या फेस्टिव्हलमध्ये पर्यटकांना घेता येऊ शकते. इतकेच नाही, तर संध्याकाळी प्रसिद्ध सनसेट पॉइंटवर सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्यसुद्धा पर्यटक अनुभवू शकतात. देशातील वेगवेगळ्या भागातील लोकांना कोकणाचे हे मनोहारी रूप अनुभवता यावे यासाठी त्यांना खास सवलतीही देण्यात येणार आहेत.

पावसाळ्यातील कोकणातील आल्हाददायक वातावरण आणि पर्यटकांची आवड पाहता या ‘मान्सून फेस्टिव्हल’ला गर्दी होणार हे नक्की. तर मग वाट कसली बघताय? या आपल्या कोकणात.. पावसाचे वेगळे रंग अनुभवायला.. 
‘कोकण ग्रीनलाइफ’सोबत कोकणातील निसर्ग आणि आडवाटा अनुभवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

अभिषेक : ९९२३७ ८१०६९
वेबसाइट : www.kokangreenlife.org
ई-मेल : kokangreenlife@gmail.com
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link