Next
पडघा केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात
मिलिंद जाधव
Tuesday, February 19, 2019 | 12:53 PM
15 0 0
Share this article:भिवंडी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या २०१५पासून सुरू  केलेल्या उपक्रमांतर्गत शिक्षणात होणाऱ्या बदलांवर चिकित्सा व्हावी व शिक्षकांना योग्य माहिती मिळावी म्हणून भिवंडी तालुक्यातील पडघा शैक्षणिक केंद्राची मासिक शिक्षण परिषद पडघा-समतानगर बोरिवली जिल्हा परिषद मराठी शाळेत नुकतीच पार पाडली.

शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान पडघा केंद्राचे प्रमुख रमेश शेरे यांनी भूषविले. या वेळी मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व जीवन अधिक गतिमान करण्याच्यादृष्टीने पडघा केंद्रप्रमुख रमेश शेरे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. ‘विद्यार्थी प्रगत करण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी’ यावर रमेश म्हसकर यांनी शिक्षकांना विविध पैलूंची माहिती देत मार्गदर्शन केले.

‘शिक्षकांना येणाऱ्या अडी-अडचणींवर कास्ट्राइब शिक्षक संघटना नेहमीच पाठपुरावा करेल,’ असे कास्ट्राइ शिक्षक संघटना अध्यक्ष विजयकुमार जाधव यांनी सांगितले. शिक्षकांना बँकेत येणाऱ्या अडचणींवर कशा प्रकारे मात करायची यावर शाम मोराणकर यांनी मार्गदर्शन केले. कवी मिलिंद जाधव यांनी शालेय जीवनावर आधारित कविता शिक्षण परिषदेत सादर केली.या वेळी जिल्हा परिषद शाळा पडघा, भादाणे, शेरेकर पाडा, चिंबीपाडा, आन्हे, सोर, वांद्रे, देवळी, आनंद नगर बोरिवली (आदिवासी पाडा) बोरिवली, वैजोळा या ११ शाळा सहभागी झाल्या होत्या. या प्रसंगी सुरेखा गायकवाड, स्वाती गिरी, रमेश म्हसकर, हर्षला बांगर, शाम मोराणकर, प्रमोद शिंदे, मधुकर महानुभव, हेमलता पितळे, पुष्पा सोनावणे, अनिता सडेकर, सुनिता शिवदे, प्रशांत तुपे, शुभांगी चांदोरकर, शोभा शेवलो, गणेश गायकवाड, सुलेखा गायकवाड, धनश्री होले, रूपाली पाटील, सुनिता शिवदे, मनीषा सरकाटे, प्रकाश सोनावणे, बनाजी दरेकर, क्वादीर शेख, शाहिस्ता शेख, सुनिता सूर्यवंशी, मुशर्रत शेख, ताहिरा अन्सारी, नकिसा शेख, रूपाली पाटील, विजयकुमार जाधव, संतोष गाढे आदी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रश्मी दोंदे, माजी अध्यक्ष रोहिणी दोंदे, बोरिवली ग्रामपंचायत सदस्य आविष्कार दोंदे, विनोद जाधव, रोहिदास दोंदे, विद्या जाधव, मिलिंद जाधव यांसह महिला बचत गटांतील महिलांचीही या वेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन सहशिक्षिक्षिका स्वाती गिरी यांनी केले. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search