Next
गाजलेल्या चित्रकारांची चित्रे झाली ‘जिवंत’
प्रेस रिलीज
Tuesday, January 30 | 03:23 PM
15 0 0
Share this story

पुणे : गणपतराव म्हात्रे, पाब्लो पिकासो, एडवर्ड मूंच, वैन गो, साल्व्हादोर दाली, फ्रीडा काहलो, लिओनार्डो व्हिन्सी या चित्रकारांची पारंपरिक चित्रे प्रदर्शनात सजीव झाली. यामध्ये महाराष्ट्रीयन स्त्री, द स्क्रीम (किंकाळी) अशा प्रकारच्या अनेक कलाकृती प्रदर्शनात जिवंत होऊन उभ्या होत्या. निमित्त होते ते ‘आर्ट वॉक अँड ग्राफिटी वॉल २०१७-१८’ प्रदर्शनाचे

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी संचालित ‘स्कूल ऑफ आर्ट अँड आर्ट अ‍ॅकॅडमी’तर्फे ही नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आली होती. प्रजासत्ताक दिनी या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. टी. एस. भाल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘एमसीई सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते.

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी वेशभूषा आणि रंगभूषा करून गाजलेल्या चित्रकारांच्या चित्रांना जिवंत रूप दिले होते. त्यात ऋषिकेश कुचेकर, गणेश आर. पै, शाहीन मिसाळ, क्षितिजा शहा या विद्यार्थ्यांनी चित्रस्वरूप भूमिका केल्या. आकाश लष्करे, अमित ढावरे, शाहीन इनामदार, मंदार जोशी, ओंकार पवार या विद्यार्थ्यांनी रंगभूषा केली होती.

अशा स्वरूपातील प्रदर्शनाची प्रा. महेश निरंतरे आणि कपिल अलास्कार यांची मूळ संकल्पना असून, सुभाष खंडाळे, भारत लोंढे आणि  हेमा जैन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.

या वेळी संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम, सहसचिव इरफान शेख, ‘स्कूल ऑफ आर्ट अँड आर्ट अ‍ॅकॅडमी’च्या संचालक हेमा जैन, प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link