Next
‘टायकॉन पुणे २०१८’चे सहावे सत्र उत्साहात
प्रेस रिलीज
Thursday, April 26, 2018 | 04:14 PM
15 0 0
Share this article:

डॉ. आनंद देशपांडे यांना गौरविताना मान्यवर.पुणे : टाय पुणे यांच्या वतीने ‘टायकॉन पुणे २०१८’ परिषदेच्या सहाव्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील इकोसिस्टमचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने ही परिषद झाली.

शहरात आयोजित होणारी ही परिषद येथील सर्वांत मोठी उद्योजक परिषद असून, या माध्यमातून ५०० हून अधिक उद्योजकांना व्यापक व प्रोत्साहक अनुभव घेता आला. व्यावसायिकतेची मूलतत्वे या विषयावर ‘टायकॉन’ परिषदेचा भर असून, वक्ते व पॅनलवरील व्यक्तींनी दर्जेदार संहिता उपस्थितांपुढे सादर केली. या परिषदेत पद्मश्री अलेक पदमसी, ‘Mezi.com’चे स्वप्निल शिंदे आणि डॉ. शीतल आमटे या वक्त्यांचा सहभाग होता.

‘ब्रॅंडव्हर्टायझमेंट’ या विषयावर जाहिरात गुरू अलेक पदमसी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले; तसेच, फेअर अँड हॅंडसम, लिरील, कामसूत्र आणि अन्य ब्रॅंड्सच्या जाहिरात मोहिमांमधील त्यांचे अनुभवही त्यांनी सांगितले. जाहिरात क्षेत्रात कल्पकतेचे महत्त्व नेमके का व कसे आहे, यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला.

‘टीसीएस’चे माजी सीईओ पद्भभूषण एफ. सी. कोहली आणि टाटा सन्स कंपनीचे माजी सीएफओ इशात हुसेन यांची संवादात्मक सत्रे हा या इव्हेंटचा सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण भाग होता. आता ९४ वर्षांचे असलेले एफ. सी. कोहली हे भारतीय सॉफ्टवेअर उद्योगक्षेत्राचे पिता म्हणून ओळखले जात असून, भारतातील शिक्षणपद्धतीमध्ये, विशेषतः अभियांत्रिकी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला. भारतीय शिक्षणपद्धतीतील बदलासाठी त्यांनी आयुष्यातली १५ वर्षे खर्च केली आहेत.

टाटा समुहातील ज्येष्ठ अधिकारी इशात हुसेन यांनीही ‘टीसीएस आयपीओ’बद्दल माहिती देताना ही कंपनी देशातली सर्वांत मौल्यवान कंपनी कशी बनली याबद्दलही सांगितले. टाटा समुहाच्या तत्वज्ञानामध्ये अंतर्भूत असलेली मुल्येही त्यांनी अधोरेखित केली.

टाय पुणेचे अध्यक्ष आणि मोजो नेटवर्क्सचे संस्थापक व सीईओ किरण देशपांडे म्हणाले, ‘बऱ्याच लोकांना हे माहितच नसते, की केवळ तीन टक्के स्टार्टअप्सच यशस्वी होतात. त्यामुळे, टाय पुणेने आयोजित केलेले यंदाचे टायकॉन पुणेचे सहावे सत्र इकोसिस्टीमला विकसित करण्याकडे केंद्रित केले असून शिक्षण, संवाद आणि नेटवर्किंग याभोवती फिरणारा हा विशेष उपक्रम आहे. बिझनेस व्हॅलिडेशन, सोशल सेलिंग, विक्री या विषयांपासून, स्केल, डिझाईन थिंकिंग आणि फंडिंग या मोठ्या विषयांपर्यंत या परिषदेत सखोल चर्चासत्रे आयोजित करण्यात आली असून, उद्योजकांना त्यांच्यापुढील आव्हानांच्या मुळांपर्यंत जाण्याची संधी मिळावी, हाच यामागचा हेतू होता. स्टार्ट-अप संस्थापक, नवीन कंपन्या, वृद्धीच्या पातळीवरील वा सुस्थापित उद्योजकांसाठी नक्कीच हा उपस्थित राहण्याजोगा उपक्रम होता.’

नर्चर या टाय पुणेच्या सिग्नेचर प्रोग्रामसाठी या परिषदेत विशेष दालन राखीव ठेवण्यात आले होते. नर्चर या मेंटरिंग उपक्रमाच्या सातव्या सत्रासाठी अर्जही मागवण्यात आले. नर्चर या उपक्रमाच्या गेल्या सहा सत्रांत टायने ६० कंपन्यांना मार्गदर्शन केले आहे.

टाय पुणे एंजल्सने उद्योजकांना मोठ्या फंडिंग व्यासपिठापर्यंत पोहोचण्याची संधी दिली असून यात टाय पुणे चार्टर सदस्य तसेच, जगभरातल्या गुंतवणूकदारांचा समावेश होता. यशस्वी गुंतवणुकांच्या इतिहासासह टाय पुणे नेटवर्कमध्ये मजबूत गुंतवणूक समुह म्हणून स्टार्ट अप कंपन्या व उद्योजक आपले स्थान निर्माण करू शकतात. अनेक स्टार्ट अप्सना टाय पुणे एंजल्सतर्फे मेंटरिंग, फंडिंग आणि गुंतवणूक याविषयी मार्गदर्शन लाभले आहे.

पहिल्या वार्षिक ‘टाय पुणे व्हिझिबल पुरस्कार २०१८’चे विजेते घोषित करण्यात आले असून, पद्मश्री अलेक पदमसी यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले. आदर्श उद्योजक पुरस्कार पर्सिस्टंटचे संस्थापक व सीईओ डॉ. आनंद देशपांडे यांना देण्यात आला असून, वूमन चॅंपियन पुरस्कार एलिफंट डिझाइनच्या संस्थापिका व सीईओ अश्विनी देशपांडे यांनी देण्यात आला. हा दोन दिवसीय इव्हेंट म्हणजे नवोदित उद्योजकांसाठी प्रोत्साहक व्यासपीठ ठरले असून, त्यांच्यासाठी वन-स्टॉप डेस्टीनेशन म्हणून उदयाला आला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search