Next
रेने गॉसिनी
BOI
Tuesday, August 14, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक रेने गॉसिनी याचा १४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
.......
रेने गॉसिनी१४ ऑगस्ट १९२६ रोजी पॅरिसमध्ये जन्मलेला रेने गॉसिनी हा आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक. १९५५पासून त्याने प्रसिद्ध कॉमिक लकी ल्युकसाठी लिहायला सुरुवात केली. त्याने ‘टिनटिन’ मासिकासाठीही लेखन केलं होतं; पण लवकरच त्याला अल्बर्ट उदेर्झो भेटला आणि दोघांनी मिळून धमाल पात्रांच्या धमाल विनोदी कॉमिक स्ट्रिप्स बनवायला सुरुवात केली. १९५९ साली गॉसिनीने फ्रेंच भाषेत ‘पायलट’ हे विनोदी मासिक सुरू केलं आणि उदेर्झोच्या साह्याने ‘अॅस्टेरिक्स दी गॉल’चा जन्म झाला. फ्रान्सचं पूर्वीचं नाव गॉल. रोमन साम्राज्याचे गॉलवर होणारे हल्ले एका गावात राहणारे अॅस्टेरिक्स, त्याचा परम मित्र ओबेलिक्स आणि त्यांचे गावातले सर्व सहकारी मिळून कसे परतवून लावतात त्याच्या हास्यस्फोटक धम्माल रंगीबेरंगी कथा पाहता पाहता जगभरच्या आबालवृद्ध वाचकांना खुळावून गेल्या. अॅस्टेरिक्स कॉमिक्सने सर्वांचंच आयुष्य मजेचं बनवलं. बिल ब्लांचार्त, मॉडेस्टे एत पॉम्पॉन, सिन्यॉर स्पघेटी, ओम्पापा दी रेड स्किन अशी त्याची इतर कॅरॅक्टर्स लोकप्रिय आहेत. पाच नोव्हेंबर १९७७ रोजी त्याचा पॅरिसमध्ये मृत्यू झाला. 

यांचाही आज जन्मदिन :
लोकप्रिय कादंबरीकार आणि नाटककार जयवंत दळवी (जन्म : १४ ऑगस्ट १९२५, मृत्यू : १६ सप्टेंबर १९९४) 
जिच्या पुस्तकांच्या ८० कोटींहून अधिक प्रती अनुवादित होऊन खपल्या आहेत, अशी बेस्टसेलर इंग्लिश लेखिका डॅनयल स्टील (जन्म : १४ ऑगस्ट १९४७) 
यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

प्रसिद्ध विनोदी अभिनेता स्टीव्ह मार्टिन (जन्म : १४ ऑगस्ट १९४५)
गायिका सुनिधी चौहान (जन्म : १४ ऑगस्ट १९८३) 
क्रिकेटपटू प्रवीण आमरे (जन्म : १४ ऑगस्ट १९६८) 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search