Next
‘जेट एयरवेज’तर्फे पहिल्यांदाच मुंबई ते मँचेस्टर विनाथांबा सेवा
प्रेस रिलीज
Monday, May 21, 2018 | 12:07 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘जेट एयरवेज’ आंतरराष्ट्रीय विमान कंपनीकडून पाच नोव्हेंबर २०१८पासून मुंबई ते मँचेस्टरदरम्यान पहिली विना थांबा सेवा जाहीर करण्यात आली आहे. यामुळे इंग्लंडसाठीची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. ही नवी सेवा भारताला जोडणारी पहिली विना थांबा सेवा असून, ती आर्थिक राजधानीला इंग्लंडमधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या मँचेस्टरशी जोडणार आहे. ‘जेट एयरवेज’ने या सेवेसाठी २५४ आसने असलेली विस्तीर्ण ए३३०-२२० तैनात केली असून, ती दर आठवड्याला सोमवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार असे चार दिवस कार्यरत राहील.

मँचेस्टरमुळे कंपनीच्या नेटवर्कमध्ये २१व्या आंतरराष्ट्रीय ठिकाणाची भर पडणार असून, या नव्या आणि इंग्लंडमधून उपलब्ध असलेल्या पाचव्या विनाथांबा सेवेमुळे ‘जेट एयरवेज’ मुंबई आणि इंग्लंडदरम्यान सेवा देणारी सर्वात मोठी विमान कंपनी बनली आहे. या नव्या सेवेमुळे भारतातून आणि भारताअंतर्गत विविध ठिकाणांसाठी विनाअडथळा कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. त्यात अहमदाबाद, वडोदरा, भुज, भोपाळ, बेंगळुरू, कोलकाता, कोईम्बतूर, दिल्ली, गोवा, हैद्राबाद, इंदौर, औरंगाबाद, जयपूर, चेन्नई, नागपूर, राजकोट, रायपूर, उदयपूर यांचा समावेश असून, ठिकाणी मुंबईपासून सेवा उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे या ठिकाणांव्यतिरिक्त जेट एयरवेजच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कपैकी बँकॉक, कोलंबो, हाँग काँग, सिंगापूर, ढाका आणि काठमांडू येथे जलद सेवाही उपलब्ध होणार आहे.

ही नवी सेवा कंपनीच्या सध्या मुंबई-लंडन हिथ्रो येथे दिवसातून तीनदा, विनाथांबा आणि दिल्ली-लंडन हिथ्रो यादरम्यान दररोज उपलब्ध असलेल्या नव्या सेवेला पूरक ठरणारी आहे. कंपनीने गेल्याच वर्षी २९ ऑक्टोबर रोजी अमस्टरडॅम, पॅरिस, लंडन या तीन नव्या आंतरराष्ट्रीय ठिकाणआंसाठी अनुक्रमे बेंगळुरू, चेन्नई आणि मुंबईतून नव्या सेवेला सुरुवात केली होती. त्यानंतर ही नवी सेवा सुरू करण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना ‘जेट एयरवेज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे म्हणाले, ‘इंग्लंडशी असलेल्या आमच्या दशकभराच्या नात्यामध्ये नवा अध्याय सुरू करताना आम्हाल अतिशय आनंद होत आहे. या नव्या सेवेमुळे मँचेस्टरचा आमच्या जागतिक नेटवर्कमध्ये समावेश होईल, आमचा व्यवसाय विस्तार होईल आणि आमच्या प्रवाशांसाठी इंग्लंडमधून/इंग्लंडकडे जाण्यासाठी आठवण्यातून चार दिवस विना थांबा सेवेचा पर्याय उपलब्ध होईल. या नव्या विमानसेवेमुळे कंपनी दर आठवड्याला आठ हजार आसनांची क्षमता उपलब्ध करून देणार असल्यामुळे भारत व इंग्लंडदरम्यान प्रवास करणाऱ्या व्यावसायिक तसेच लीझर प्रवाशांची सोय होईल आणि दोन्ही देशांतील व्यापार व पर्यटन हितसंबंधांना चालना मिळेल.’

मँचेस्टर हे इंग्लंडमधील लंडनबाहेरील वेगाने विकसित होणार शहर असून, ते युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे डिजिटल हब आहे. हे शहर इंग्लंडच्या उत्तर भागात केंद्रस्थानी वसलेले असून, तिते अवकाशसेवा, वाहन उत्पादन, रसायने, वित्त, माहिती तंत्रज्ञान, मीडिया, फार्मास्युटिकल आणि रिटेल क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या कार्यरत आहेत. मुंबई आणि मँचेस्टरदरम्यानच्या नव्या सेवेमुळे व्यावसायिक प्रवाशांची आणि मँचेस्टरमध्ये व त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या भारतीय समाजाची मोठी सोय होईल. हे वेगाने विकसित होत असलेले व्यावसायिक आणि औद्योगिक हब असून, तिथे युरोपमधील विद्यार्थ्यांच्या सर्वात मोठ्या कम्युनिटीजपैकी एक कार्यरत आहे. हे शहर लिव्हरपूल, लीड्स आणि शेफल्डसारख्या शहरांशी चांगल्या प्रकारे जोडले गेलेले आहे आणि त्यापासून जवळही आहे.

मँचेस्टर एयरपोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू कोवेन म्हणाले, ‘भारतातील प्रमुख शहरांपैकी एका शहरापासून थेट सेवा सुरू करणे हे प्रदीर्घ काळापासून केलेल्या मेहनतीचे आणि मँचेस्टर व मुंबईसारख्या जागतिक पातळीचे आर्थिक महत्त्व असलेल्या शहराशी दृढ संबंध जोडण्याच्या प्रबळ भावनेचे फळ आहे. आम्ही आमच्या भागिदारांबरोबर सातत्याने काम करून आमचे शहर आणि विस्तीर्ण उत्तरेचा भाग भेट देण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी आकर्षक असल्याची प्रतिमा तयार केली आहे. मला आनंद होत आहे, की ‘जेट एयरवेज’ने हेच लक्षात घेऊन भविष्यात खात्रीने लोकप्रिय होणार असलेली ही सेवा सुरू करून उत्तरेकडे राहणाऱ्या जवळपाच पाच लाख भारतीय वंशांच्या लोकांची दखल घेतली आहे. जगातल्या सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठेशी थेट कनेक्टिव्हिटी ही समृद्ध आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या स्पर्धात्मक असलेल्या उत्तरेच्या अर्थव्यवस्थेची निर्मिती व समतोल हेच बाह्यदर्शन इंग्लंडसाठी महत्त्वाची आहे. या मार्गामुळे जगातील वेगाने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्यात करून व्यवसायाला मोठी चालना मिळेल. त्याशिवाय भारतीय पर्यटक आणि गुंतवणूक उत्तरेकडे आकर्षित होण्यास मदत होईल. येत्या महिन्यांत ‘जेट एयरवेज’द्वारे सुरू केल्या जात असलेल्या मुंबई सेवेसाठी आम्ही उत्सुक आहोत.’

जेट एयरवेजचे ९डब्ल्यू१३० विमान मुंबईतून २.३० वाजता (स्थानिक वेळेनुसार) निघेल आणि मँचेस्टर टर्मिनल२ येथे ७.५५ वाजता (स्थानिक वेळेनुसार) पोहोचेल. परतीचे विमान ९डब्ल्यू१२९ मँचेस्टरवरून ९.३५ वाजता (स्थानिक वेळेनुसार) निघेल आणि मुंबई टर्मिनल२ येथे ००.४० वाजता (स्थानिक वेळेनुसार) पोहोचेल.

भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत व इंग्लंड या दोन अर्थव्यवस्थांदरम्यानचे सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी सुरू केलेल्या ‘द मँचेस्टर-इंडिया पार्टनरशिप’मुळे या नव्या सेवेला आणखी महत्त्व प्राप्त होईल. ही नवी सेवा इंग्लंड सरकारच्या लंडन हिथ्रोखेरीज इतर शहरांसाठीच्या कनेक्टिव्हिटीला चालना देण्याच्या शिफारसीलाही पाठिंबा देणारी आहे.

१८ प्रीमियरसह २५४ आसनांचा समावेश असलेले जेट एयरवेजचे ए३३०-२०० विमान नव्या क्षेत्रात कार्यरत होईल. ए३३० हे जागतिक दर्जाचे उत्पादन असून, त्यात शांत केबिन्समध्ये असलेली प्रशस्त आसने आणि ‘जेट एयरवेज’ची प्रसिद्ध, विमानअंतर्गत सेवा यांचा अनुभव घेता येईल. त्यात फाइन डायनिंगसह ‘डाइन एनीटाइम’ या संकल्पनेअंतर्गत पसंतीचे जेवण घेता येईल. प्रवाशांना कंपनीने काळजीपूर्वक तयार केलेल्या हॉलिवूड आणि बॉलिवूड सिनेमे, टीव्ही शोज, टीव्ही शॉर्ट्स, उद्योगक्षेत्रातील बातम्या, ऑडिओ यांचा संग्रह आणि कंपनीची पुरस्कार विजेती इनफ्लाइट मनोरंजन यंत्रणा जेटस्क्रीन यांचा आनंद घेता येणार आहे.

कार्गोमध्ये वाढ
नव्या विमानामुळे ‘जेट एयरवेज’च्या भारत ते इंग्लंडदरम्यान कार्गो क्षमतेमध्ये १५ टनांनी वाढ झाली आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे भारतातील शिपर्स व निर्यातदार तसेच उत्पादकांना इंग्लंडमधील दुसरे महत्त्वाचे ठिकाण खुले झाले आहे. यामुळे ‘जेट एयरवेज’च्या मुंबई आणि दिल्ली ते इंग्लंडदरम्यान दैनंदिन कार्गो क्षमतेत एका दिशेने असलेली कार्गो क्षमता ११५ टनांवर गेली आहे.

मँचेस्टरचा मार्ग खुला झाल्यामुळे विमान कंपनीला मुंबई व इतर ठिकाणांपासून अतिशय गरजेची असलेली दैनंदिन थेट सेवा उपलब्ध करून नाशवंत वस्तू, फार्मास्युटिकल्स, अभियांत्रिकी साहित्य, कापड, खाण्याचे पदार्थ, खास वैद्यकीय उपकरणे यांची वाहतूक करता येणार आहे. या विना थांबा सेवेमुळे व्यापाराला चालना मिळेल आणि भारत व मँचेस्टरदरम्यान व्यवसाय विकसित होईल.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search