Next
‘लिबहेर्’तर्फे भारतीय बाजारपेठेत रेफ्रिजरेटर
प्रेस रिलीज
Wednesday, January 31, 2018 | 06:04 PM
15 0 0
Share this story

मुंबई : लिबहेर्, ही नावीन्यपूर्ण रेफ्रिजरेशन आणि कुलिंग घरगुती उपकरणांमध्ये स्थानिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रमुख उत्पादक असलेल्या कंपनी, भारतीय बाजारपेठतील प्रमुख प्रकारातील रेफ्रिजरेटर्स मे महिन्यापर्यंत, सर्वांसाठी सादर करण्यास सज्ज आहे. रेफ्रिजरेटर्सची ही नवी श्रेणी उत्पादनात जर्मन इंजिनिअरिंग सादर करत आहे, ही सुविधा भारतीय ग्राहकांच्या गरजांनुसार देण्यात येत आहे.

भारतामधील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील उत्पादनाच्या युनिटसाठी सध्या ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. पालक कंपनीचा संपूर्ण जगभरात ५० देशांपेक्षा जास्त ठिकाणी १३० कंपन्यांचा विस्तार आहे.

लिबहेर् अप्लायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख विक्री अधिकारी राधाकृष्ण सोमयाजी म्हणाले, ‘तब्बल ६० वर्षांपासून, रेफ्रिजरेशन आणि फ्रिजिंग सामग्रीसाठी ‘लिबहेर्’ दर्जात्मक सेवा देत आहे, संरचना आणि नावीन्यपूर्णता या तत्त्वज्ञानानुसार सेवा देत आहे. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे आम्हाला उच्चतम दर्जा सामुग्री आणि प्रक्रिया देता येत आहेत. यामुळे आमची उत्पादने अतिशय टिकाऊ आणि उर्जा सक्षम होतात; तसेच मास प्रीमियम सिगमेंट हा जागतिक स्तरावरील नवा प्रकार असून, आमची उत्पादने खास त्यासाठीच बनवण्यात आलेली आहेत, खासकरून भारतीय बाजारपेठेतील गरजांची पूर्ती करणे आणि आसपासच्या प्रदेशात प्लांटद्वारे उत्पादन करणे असे कार्य करतात.’

भारतात प्लांट उभारणीचा निर्णय भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’मधून आला आहे. महाराष्ट्राच्या औरंगाबादेतील शेंद्रा इंडस्ट्रीअल पार्कमध्ये उभारणीचा निर्णय परिसराच्या मध्यभागी असणे आणि भारतातील विविध भागांमध्ये लॉजिस्टिक नेटवर्कच्या माध्यमातून सुविधा देण्यासाठी सक्षम असणे यातून घेण्यात आलेला आहे. भारतीय बाजारपेठेला साजेशा उच्चतम दर्जाच्या रेफ्रिजरेशन सामग्रीचा पुरवठा करण्याच्या ध्येयासह, प्लांटमध्ये २०१८पासून ५०० हजार पेक्षा जास्त कुलिंग अप्लायन्सेसचे प्राथमिक उत्पादन करण्याची क्षमता निर्माण होईल.

‘लिबहेर्’बद्दल
लिबहेर् ग्रुपच्या प्रत्येक खंडातील ५० देशांमध्ये १३०पेक्षा जास्त कंपन्या आहेत, आणि येथे ४२ हजार ३०० लोक येथे कार्यरत आहेत. २०१६मध्ये, लिबहेर् कंपनीने तब्बल नऊ अब्ज युरोंपेक्षा जास्त टर्नओव्हर पार केला आहे. स्थानिक उपकरणांच्या उत्पादनांत रेफ्रिजरेशन आणि फ्रीजर्सचे चार देशांसाठी खासगी आणि व्यावसायिक प्रकारांसाठी विभागीय उत्पादन केले जाऊ शकते, या नव्या प्लांटमुळे पाच उत्पादन केंद्र झालेली आहेत. विभागीय नियंत्रक कंपनी म्हणजेच जर्मनीतील ओशसेनहाउसेन येथील लिबहेर् - हाउसगेरेट जीएमबीएच ही कंपनी होय.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link