Next
सई देवधरने आयोजित केली खास बर्थ डे पार्टी
प्रेस रिलीज
Wednesday, June 13, 2018 | 11:06 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : आईचा वाढदिवस मुलांसाठी नेहमीच खास असतो. अशाच खास दिवसाचे औचित्य साधून अभिनेत्री सई देवधरनेसुद्धा अशीच एक खास पार्टी आयोजित करत आपल्या आईला सरप्राईज दिले. आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढत सईने आईचा म्हणजेच ‘स्टार प्रवाह’च्या कार्यक्रम प्रमुख श्रावणी देवधर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला.

या खास सेलिब्रेशनमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, विक्रम फडणीस, सिद्धार्थ कुमार तिवारी, आवर्जून उपस्थित होते.

‘आपल्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळींना बोलवावे असे आईला वाटत होते. त्यामुळे मी पुढाकार घेऊन ही डान्स पार्टी आयोजित केली. आईसह सगळ्यांनीच पार्टी खूप एन्जॉय केली. या पार्टीमुळे आईला तिच्या मित्रमंडळींबरोबर वेळ घालवता आला, याचा मला आनंद वाटतो,’ असे सईने सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search