Next
मानसी किर्लोस्कर यांचे व्याख्यान
प्रेस रिलीज
Wednesday, January 17, 2018 | 12:10 PM
15 0 0
Share this story

‘किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेड’च्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मानसी किर्लोस्करनवी दिल्ली : ‘बीडब्ल्यू बिझनेसवर्ल्ड यंग आंत्रप्रेन्युअर समिट’ या परिषदेचे आयोजन ल मेरिडियन हॉटेलमध्ये नुकतेच करण्यात आले. या परिषदेने भारतीय नवउद्योजकीय परिसंस्थेशी संबंधित विषयांवर रंजक विचारमंथन घडवून आणले. या प्रतिष्ठित परिषदेत एक प्रमुख वक्त्या म्हणून ‘किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेड’च्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मानसी किर्लोस्कर यांना आमंत्रित करण्यात आले होते. ‘यशस्वी कुटुंब व्यवसायाला (फॅमिली बिझनेस) चालना देणे किती अवघड/किती सोपे?’ या विषयावर त्यांनी उत्कृष्ट व्याख्यान दिले.

त्या म्हणाल्या, ‘ताकद ही स्पर्धात्मकता आणि कामगिरी यांचे फलित असून, स्पर्धात्मक व आव्हानात्मक वातावरणच त्याची मागणी करते. त्यामुळे कुटुंब व्यवसाय उदयाला यायला हवेत. वारसा पुढे नेण्याच्या इच्छेतून अनेक कुटुंब व्यवसायांचे छोट्या गटांत विभाजन होते; परंतु त्यांना स्वतःची व्यवसाय प्रारुपे व पद्धती विकसित कराव्या लागतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की, कुटुंब चालवत असलेल्या व्यवसायांपैकी ३० टक्क्यांहून कमी व्यवसायच तिसऱ्या पिढीपर्यंत टिकून राहतात. मी तर दीडशे वर्ष जुन्या व्यवसाय समुहातील पाचव्या पिढीतील आहे. तरीही माझे ठाम मत आहे की, सदैव काळाशी सुसंगत राहणे फार महत्त्वाचे असते. काळानुसार व्यवसाय प्रारुपे, व्यूहरचना, प्रक्रिया व नवउद्योगांची निर्मिती सुरूच राहील. वारसा पुढे चालवणे महत्त्वाचे असते, पण त्याची चाकोरी मोडणेही अत्यावश्यक असते.’

या परिषदेत दिवसभर चाललेल्या सत्रांना विविध उद्योगांतील दिग्गज, सदस्य व आमंत्रितांनी उपस्थिती लावून प्रचंड प्रतिसाद दिला.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link