Next
विल्यम ट्रेव्हर
BOI
Thursday, May 24, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

परिणामकारक लघुकथालेखनासाठी नावाजल्या गेलेल्या विल्यम ट्रेव्हरचा २४ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....
.....
२४ मे १९२८ रोजी आयर्लंडमध्ये जन्मलेला विल्यम ट्रेव्हर हा कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून ओळखला जातो. त्याच्या कथा परिणामकारक असत आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे त्याला ‘आयरिश चेकॉव्ह’ असं म्हटलं जाई. त्याच्या कथांमध्ये मृत्यू किंवा उदासीनता यांचं सावट असे. 

‘ए स्टँडर्ड ऑफ बिहेवियर’ या पहिल्या कादंबरीपाठोपाठ आलेलं त्याचं ‘दी ओल्ड बॉइज’ हे पुस्तक गाजलं आणि त्याला पारितोषिकसुद्धा मिळालं. त्यानंतर तो लेखनाला वाहून घेण्यासाठी इंग्लंडला स्थलांतरित झाला. 

दी बोर्डिंग हाउस, एलिझाबेथ अलोन, दी चिल्ड्रेन ऑफ डीनमथ, फूल्स ऑफ फॉर्च्युन, फेलीशियाज जर्नी, दी स्टोरी ऑफ ल्युसी गोल्ट, दी डे वुई गॉट ड्रंक ऑन केक, दी बॉलरूम ऑफ रोमान्स, एंजल्स अॅट दी रिट्झ, दी हिल बॅचलर्स, अशी त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

त्याला तीन वेळा व्हाइटब्रेड पुरस्कार आणि एकदा हॉथोर्नडन पुरस्कार मिळाला होता; मात्र पाच वेळा नामांकन मिळूनही त्याचा बुकर पुरस्कार हुकला होता. 

२० नोव्हेंबर २०१६ रोजी त्याचा सॉमरसेटमध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search