Next
मुंबई महानगर क्षेत्रात ‘एमजीएल’ची तब्बल २०० सीएनजी स्टेशन
BOI
Monday, May 08, 2017 | 06:38 PM
15 2 0
Share this article:

मुंबई : शहरी क्षेत्रात गॅस वितरण करणारी महत्त्वाची कंपनी असलेल्या महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) मुंबई महानगर क्षेत्रात २०० सीएनजी स्टेशनचा पल्ला गाठला आहे. कंपनीने दोनशेवे सीएनजी स्टेशन नुकतेच बदलापूरमध्ये सुरू केले आहे. बदलापूरमध्ये मेसर्स पाटील पेट्रोलियम येथे सीएनजी स्टेशन सुरू करून महानगर गॅस लिमिटेडने कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ-बदलापूर क्षेत्रात सीएनजीच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला सुरुवात केली आहे. 

मुंबई महानगर क्षेत्रात महानगर गॅस लिमिटेडद्वारे सीएनजीवर धावणाऱ्या पाच लाख वाहनांना दोनशे हून अधिक सीएनजी स्टेशनमधील ११०० डिस्पेन्सिंग युनिटद्वारे पुरवठा केला जात आहे. त्यांची क्षमता २८ लाख किलो एवढी क्षमता आहे. २००व्या स्टेशनद्वारे कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ-बदलापूर क्षेत्रात प्रभाव वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. 

या महत्त्वाच्या टप्प्याविषयी बोलताना महानगर गॅसचे व्यवस्थापकीय संचालक राजीव माथुर म्हणाले, ‘महानगर गॅस सीएनजीच्या मागणीची पूर्तता व्यवस्थित आणि योग्य प्रकारे करत आहे. आमच्या सीएनजी नेटवर्कमागे कार्यक्षेत्रात सहज उपलब्धता आणि सुलभता यांची प्रेरणा आहे आणि २००व्या सीएनजी स्टेशनद्वारे सुरक्षित, पूरक आणि खात्रीच्या ऊर्जेचे वचन महानगर गॅस पूर्ण करत आहे. मुंबई महानगर क्षेत्रात वाढत्या ग्राहकांची गरज पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.’ 

मुंबई महानगर क्षेत्रात दोन सीएनजी स्टेशन्समधील सरासरी अंतर, पश्चिम उपनगरात १.५१ किलोमीटर, मध्य उपनगरात १.४७ किलोमीटर, नवी मुंबईत ३.२ किलोमीटर, तर कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ-बदलापूर क्षेत्रात ते ४.५ किलोमीटर आहे.
 
‘कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ-बदलापूर क्षेत्रात सीएनजीच्या पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी आम्ही योग्य जमीन असलेल्या स्थानिक नागरिकांना सीएनजी स्टेशनसाठी देऊ करावी असे आवाहन करतो. शहराच्या आतल्या भागात जागेचा अभाव ही सीएनजी स्टेशनच्या विस्तारात मोठी अडचण आहे. सीएनजी स्टेशन सुरू करण्यासाठी लोकांनी जमीन उपलब्ध केल्यास या पर्यावरणस्नेही इंधनाचा प्रसार करण्यास ते खूप मोठी प्रोत्साहन असेल,” असेही माथुर म्हणाले. 

बदलापूरबरोबरच महानगर गॅस कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल, तळोजा आणि खारघरमधील दुर्लक्षित भागात आपल्या जाळ्याचा विस्तार करत आहे. सध्या असलेल्या आणि नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागात नैसर्गिक गॅसच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महानगर गॅस मुंबई महानगर क्षेत्रातल्या चार सिटी गेट्सद्वारे विविध स्रोतांकडून गॅस घेत आहे. 

‘महानगरात राहणाऱ्या जनतेला आपल्या वाहनाचे इंजिन सीएनजीसाठी रूपांतरित करण्याचे महत्त्व पटत आहे. यामुळे होणारी मागणी सुखावणारी आहे. ती प्रोत्साहित करणारी आणि त्याच वेळी आव्हानात्मकही आहे. सीएनजी हे भविष्याचे इंधन आहे, यात काहीच शंका नाही. आपल्याला पर्यावरणाचे संवर्धन करायचे असेल तर कमी प्रदूषण करणाऱ्या सीएनजी, पीएनजीसारख्या इंधनाची आपल्याला गरज आहे. सध्या अखत्यारीत नसलेल्या लोकसंख्येला सीएनजीच्या कक्षेत आणणे आम्ही सुरू ठेवणार आहोत,” असेही माथुर यांनी नमूद केले. 

‘महानगर गॅस’बाबत :
महानगर गॅस लिमिटेड ही शहरी भागात गॅस वितरण करणारी भारतातील मोठ्या कंपन्यांमधील एक आहे. मुंबईला नैसर्गिक गॅसचा पुरवठा करण्याचा ‘महानगर गॅस’ला २० वर्षांचा अनुभव आहे आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि पाइप्ड नॅचरल गॅसच्या वितरणासाठी मुंबई व सभोवतालच्या भागात आणि महाराष्ट्राच्या रायगड भागात ही कंपनी एकमेव अधिकृत वितरक आहे. महानगर गॅस लिमिटेड हे गेल (इंडिया) लिमिटेड आणि बीजीएपीएच (रॉयल डच शेल पीएलसी) आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त प्रकल्प आहे. प्रदूषणमुक्त पर्यावरणाला योगदान देणारी सुरक्षित, पूरक आणि विश्वसनीय ऊर्जा देण्याचा ‘महानगर गॅस’चा दृष्टिकोन आहे. महानगर गॅस आयएसओ 9001:2008, आयएसओ-14001:2004 आणि ओएचएसएएस 18001:2007 ने प्रमाणित आहे. 

सध्या महानगर गॅस ही कंपनी नऊ लाख घरे आणि तीन हजार छोटे व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापनांना सेवा देत आहे. महानगर गॅस दोन लाख रिक्षांसहित साडेपाच लाख वाहने आणि मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई आणि त्या पलीकडील ५९ हजार टॅक्सी आणि दोन लाखांहून अधिक कार्सना पुरवठा करत आहे. बेस्ट/टीएमटी/महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ/एनएनएमटी यांच्या ३३०० बसेस, सहा हजार एलसीव्हीज/टेम्पो/ट्रक/खासगी बसेस यांना ४२० किलोमीटर स्टील आणि ४४०० किलोमीटर एमडीपीई पाइपलाइन सिस्टीम आणि २०० सीएनजी फिलिंग स्टेशनमधील ११०० डिस्पेन्सिंग युनिटद्वारे सीएनजीचा पुरवठा केला जातो.

अधिक माहितीसाठी संपर्क :
आरिफ मलिक
मोबाइल : ९८३३९ ३४००२, ई-मेल : aarif@conceptpr.com

नेहा सिंग 
मोबाइल : ७६६६६७ ४७६०२, ई-मेल : neha@conceptpr.com
 
15 2 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search