Next
मानसी किर्लोस्कर पहिल्या यूएन यंग बिझनेस चॅम्पियन
BOI
Thursday, October 11, 2018 | 04:02 PM
15 0 0
Share this story

मानसी किर्लोस्करपुणे : ‘किर्लोस्कर सिस्टीम्स लिमिटेड’च्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मानसी किर्लोस्कर यांची संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) भारतातील शाश्वत विकास ध्येये (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स - एसडीजी) कार्यक्रमाच्या पहिल्या ‘यंग बिझनेस चॅम्पियन’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाला भारतात चालना देण्याची जबाबदारी मानसी किर्लोस्कर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

उदयोन्मुख तरुण व्यवसाय नेतृत्व असलेल्या मानसी किर्लोस्कर यांच्याकडे शाश्वत विकास ध्येयधोरणांवरील संवादाचा आणि व्यवसाय जबाबदाऱ्यांचा आपल्या सहकाऱ्यांमध्ये विस्तार करण्याची; तसेच या कामी इतर तरुण उद्योजकांना स्वयंसक्रिय बनवण्यासाठी प्रेरणा देण्याची अद्वितीय क्षमता आहे. याखेरीज विकासात उद्योगाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करून संयुक्त राष्ट्रांसमवेत हवामान बदल, प्लास्टिकमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन आणि महिला सक्षमीकरण या विषयांवरही त्या काम करणार आहेत. ‘यूएन-इंडिया बिझनेस फोरम’च्या (यूएनआयबीएफ) उद्दिष्टांना चालना देण्यातही त्या महत्त्वाची भूमिका बजावतील.

‘संयुक्त राष्ट्रांसोबत पहिली यंग बिझनेस चॅम्पियन म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी स्फूर्तिदायक बहुमान आहे. शाश्वत विकास ध्येयधोरणे (एसडीजी) हा कार्यक्रम उद्योगांना भारताच्या भावी विकासात सहभागी होण्याची अनोखी संधी आहे. शाश्वत विकासाला गती देण्याचे सुप्त सामर्थ्य उद्योगांमध्ये आहे. माझ्या कामातून मी नवउद्योगांतील नोकरदार अथवा मालक अशा सर्व तरुण नेतृत्वांमध्ये हाच संदेश पोचवणार आहे’,अशी भावना मानसी किर्लोस्कर यांनी व्यक्त केली. 

मानसी यांच्या नियुक्तीचे स्वागत करताना भारतातील संयुक्त राष्ट्राचे निवासी समन्वयक युरी अफनासेव म्हणाले, ‘ही नियुक्ती करताना मला आनंद होत आहे. शाश्वत विकास ध्येयांना चालना देण्यात एखादे तरुण व्यवसाय नेतृत्व किती समर्पित असू शकते, याचे मानसी उत्तम उदाहरण आहेत. पृथ्वी अधिकाधिक शाश्वत राहावी या उद्दिष्ट्यात उद्योगांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबाबत आम्ही मानसी यांच्या मदतीने प्रबोधन घडवू.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link