Next
प्रकाश पिसाळ विश्वनायक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
प्रेस रिलीज
Wednesday, August 16, 2017 | 03:44 PM
15 0 0
Share this article:

प्रकाश पिसाळ यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवताना नितीन गडकरी. शेजारी खा. विष्णू पदमशीया, सुरेश यादव, ओमप्रकाश आंदळे आदी मान्यवर.कराड (सातारा) : भारत सरकार संलग्न क्रांती ग्रामविकास संस्थेमार्फत दिला जाणारा विश्वनायक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार दैनिक ऐक्यचे सिनीअर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह व  साप्ताहिक स्वप्ननगरीचे कार्यकारी संपादक प्रकाश पिसाळ यांना राष्ट्रीय स्तरावर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल देण्यात आला.

हा पुरस्कार क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्टला नवी दिल्ली येथे एन. वाय. के. भारत सरकार संलग्न क्रांती ग्राम विकास संस्थेतर्फे मानव संशोधन आणि विकास (कठऊ) मंत्रालय, संसदीय समितीचे अध्यक्ष सत्यनारायण जटीया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

प्रकाश पिसाळ यांना सन्मानचिन्ह देवून गौरवताना सत्यनारायण जटीया. शेजारी ज्ञानेश्वर मुळे, ह.भ.प बोधले महाराज, सुरेश यादव, ओमप्रकाश आंदळे आदी.‘क्रांती प्रेरणा पुरस्कार २०१७’ चे आयोजन नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब, रफीमार्ग येथे केले होते. कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी राज्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, विदेश मंत्रालय सचिव ज्ञानेश्वर मुळे, ह. भ. प बोधले महाराज, मिर्झा मेहताब बेग, सामाजिक न्याय मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी मनीष गवई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रा. सुरेश गायकवाड, नितीन पाटील उपस्थिती होते.

प्रकाश पिसाळ यांना विश्वनायक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. धनंजय महाडिक, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

याप्रसंगी मान्यवरांनी क्रांती दिनाचे महत्त्व विशद करून विविध राज्यातून आलेल्या सर्व सत्कारमूर्तींचे कौतुक केले. श्रीकांत राऊत, सारिका मोरे, संदीप कोकाटे, पुजा गोहर, कविता नारायणन, ओमप्रकाश आंदळे यांनी स्वागत केले. सुरेश यादव यांनी प्रास्ताविक केले. भाग्यश्री शिब्बू यांनी सूत्रसंचालन केले, तर सुहासिनी केकाणे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search