Next
डाळ साबुदाणा
BOI
Wednesday, September 06 | 10:00 AM
15 0 0
Share this story

डाळ साबुदाणा

एक स्वादिष्ट घटक आणि स्टार्चचे गुणधर्म असलेल्या साबुदाण्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. आपल्याकडे केवळ उपवासाचा पदार्थ म्हणून खाल्ला जाणारा हा साबुदाणा इतर वेळेस फार खाण्यात येत नाही. म्हणूनच यावेळेस ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात आपण पाहणार आहोत डाळ साबुदाणा...
...................

साबुदाणाभारतात साबुदाण्याचा वापर पापड, खीर आणि उपवासाची खिचडी हे पदार्थ बनवण्यासाठी होतो. यामध्ये प्रथिने आणि फायबर मोठ्या प्रमाणात आहेत. वाढत्या वयात वजन वाढवण्यासाठी, शरीराचा रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी साबुदाण्याचा उपयोग होतो. 

आज आपण पाहत असलेला पदार्थ आजीच्या काळातला आहे. पण आपल्यासाठी अगदी नवीन. गणपती विसर्जन किंवा सणा-वारांना होणाऱ्या वाटल्या डाळीची नवीन आवृत्ती म्हटली तरी चालेल. नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला तर ही हटके रेसिपी नक्कीच आवडेल. वाटली डाळ केली की ती हमखास उरतेच. मग त्यापासून हा पदार्थ करायला सोपा आणि अत्यंत चविष्ट आहे. थंड झाला तरी छान लागतो आणि पोटभरीचा होतो.     

साहित्य : 
हरभरा डाळ – एक वाटी, साबुदाणा – अर्धी वाटी, तेल – दोन मोठे चमचे, फोडणीला हळद, जिरे, मोहोरी, हिंग, चवीपुरती मिरची, ओले खोबरे – पाव वाटी, सजावटीसाठी कोथिंबीर 


कृती : 
- सर्वप्रथम चण्याची डाळ व साबुदाणा भिजत घाला. 
- डाळ भिजली, की मिक्सरमधून वाटून घ्या. 
- मोहोरी, जिरे, हळद, हिंग, मिरची यांची फोडणी करून घ्या.
- त्यात ही डाळ घालून व्यवस्थित परतून घ्या. झाकण ठेवा. 
- एरवी आपण करतो तशी ही वाटली डाळ होईल. 
- आता यात साबुदाणा घाला व चांगली वाफ येऊ द्या. 
- मग चवीपुरते मीठ, कोथिंबीर घाला. 
- दिसताना कांदे पोह्यासारखा दिसणारा हा पदार्थ चवीला वेगळा आणि छान लागतो. 

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link