Next
ठाण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती
प्रेस रिलीज
Thursday, July 13, 2017 | 06:45 PM
15 0 0
Share this article:

ठाण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात खासगी व लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या २० एमएलडी क्षमतेच्या पाणी विक्षारण आणि १० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. अशा पद्धतीचे प्रकल्प राबविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. यामुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळणार आहे.

महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर स्वाक्षरी करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रात पीपीपी तत्त्वावर १० मेगावॉट क्षमतेची सौर ऊर्जेची वीज निर्माण करणारी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही यंत्रणा एकूण २१ ठिकाणी बसविण्यात येणार असून, या माध्यमातून १० मेगावॉट सौरऊर्जा निर्माण करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर महापालिकेच्या ५६ शाळांच्या छतावरही ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. भविष्यात या यंत्रणेतून जवळपास १५३ मेगावॉट सौर ऊर्जा निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेची गरज ५५ मेगावॉट असून, अतिरिक्त ऊर्जा नागरिकांना पुरविता येऊ शकते, अशा पद्धतीने या प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा करार ठाणे महानगरपालिका आणि ठाणे सोलर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये करण्यात आला.

दरम्यान, खाडीच्या पाण्यावर प्रक्रिया करून राबविण्यात येणाऱ्या पाणी विक्षारण प्रकल्पाच्या करारावरही स्वाक्षरी करण्यात आली. फॉन्टस डिसालिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी हा करार करण्यात आला. या प्रकल्पाचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असून दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्णत: कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पांतर्गत २० दशलक्ष लिटर खाडीच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. अशा पद्धतीचा प्रकल्प राबविणारी ठाणे महापालिका देशातील पहिली महापालिका आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search