Next
दादाराव नांगरेचे उज्ज्वल यश
मिलिंद जाधव
Tuesday, September 25, 2018 | 04:14 PM
15 0 0
Share this article:

उल्हासनगर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात राहणारा दादाराव पंजाबराव नांगरे हा विद्यार्थी उल्हासनगर महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन शिबिरात झालेल्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. या शिबिरात सहाशे विद्यार्थी सहभागी झाले होते. उपमहापौर पंचशीला पवार यांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले. उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दादाराव नांगरे याला भेट म्हणून काही उपयुक्त पुस्तके दिली. 

दादाराव पंजाबराव नांगरे ‘समाजकल्याण विद्यार्थी कृती समिती’चा अध्यक्ष असून, मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात खुल्या वर्गातून द्वितीय क्रमांकाने त्याची निवड झाली आहे. हा विद्यार्थी मूळचा हिंगोली जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील असून, शेती करून त्याचे वडील दादाराव त्याच्यासह त्याच्या अन्य चार भावंडांचे शिक्षण करत आहेत. तो स्वतः कम्प्युटर सायन्समध्ये बीएस्सी झाला असून, त्याने राज्यशास्त्र विषय बीए आणि फायनान्स हा विषय घेऊन एमबीए केले आहे. त्याची एक बहीण बीए झाली आहे, तर दुसरी बहीण कम्प्युटर इंजिनीअर आहे. बाकीची भावंडे शाळेत शिकत आहेत. ‘येत्या काळात मी नक्की प्रशासकीय अधिकारी होणार आणि समाजासाठी मोठे काम करणार,’ असा विश्वास त्याने व्यक्त केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sanjay nivrati nangare About 361 Days ago
Hearty Congratulations Dadu...hatt's off to your attitude towards the end of the social work for our people...'!
0
2

Select Language
Share Link
 
Search