Next
जेम्स हेरीअट
BOI
Tuesday, October 03 | 04:00 AM
15 0 0
Share this story

पशुवैद्याच्या जीवनाविषयी आपल्याला फारशी कल्पना नसते. स्वानुभवांवर आधारित रोचक पुस्तकं लिहून लोकप्रियता मिळवलेला सुप्रसिद्ध पशुवैद्य जेम्स हेरिअट याचा तीन ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्पपरिचय...
..........

जेम्स हेरीअट

तीन ऑक्टोबर १९१६ रोजी संडरलँडमध्ये जन्मलेल्या जेम्स आल्फ्रेड वाइट या सुप्रसिद्ध पशुवैद्याने ‘जेम्स हेरिअट’ या नावानं आपल्या अनुभवांवर आधारित प्राण्यांविषयी लिहिलेली पुस्तकं तुफान लोकप्रिय झाली.
यॉर्कशरमधल्या लोकजीवनाविषयी आणि तिथल्या प्राण्यांविषयी त्याचं बहुतांशी लेखन आहे. त्यात त्याच्या स्वानुभवांचीही जोड आहे. त्यामुळे त्यातलं चित्रण अतिशय जिवंत वाटतं. त्याची बहुतेक पुस्तकं कायमच ‘टॉप सेलिंग लिस्ट’मध्ये असत. औद्योगिकीकरणामुळे आणि यांत्रिकीकरणामुळे लोकजीवनावर आणि तिथल्या प्राणिजीवनावर पडत गेलेला परिणाम त्याच्या कथांमधून दिसून येतो. 

‘इफ ओन्ली दे कुड टॉक’ हे त्याचं पहिलंच पुस्तक तुफान गाजलं. अमेरिकेत ते ‘ऑल क्रीचर्स ग्रेट अॅन्ड स्मॉल’ या नावाने लोकप्रिय झालं होतं आणि त्यावर फिल्मही बनली होती.
 
इट शुड नॉट हॅपन टू ए व्हेट, लेट स्लीपिंग व्हेट्स लाय, व्हेट इन हार्नेस, व्हेट्स माइट फ्लाय, व्हेट इन अ स्पिन, दी लॉर्ड गॉड मेड देम ऑल, एव्हरी लिव्हिंग थिंग अशी त्याची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

२३ फेब्रुवारी १९९५ रोजी त्याचा थरल्बीमध्ये मृत्यू झाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link