Next
आगाशे विद्यामंदिरात योगदिन साजरा
BOI
Monday, June 24, 2019 | 01:33 PM
15 0 0
Share this article:

आगाशे विद्यामंदिरात जागतिक योग दिनी आसने करताना विद्यार्थी, शिक्षक.

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून येथील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी प्राणायाम व विविध आसने केली. या वेळी नगरसेविका मानसी करमरकर, पटवर्धन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एल. एस. जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

लहान वयापासूनच विद्यार्थ्यांची तब्बेत ठणठणीत राहावी, यासाठी शाळेतील योगा शिक्षिका स्वाती मलुष्टे यांच्यामार्फत पहिली ते चौथीच्या एकूण १२ तुकड्यांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना वर्षभर योगाचे धडे दिले जातात. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी मान्यवरांचा सत्कार केला. या वेळी सर्व शिक्षक उपस्थित होते. 


योग शिक्षिका मलुष्टे यांनी तिसरीच्या विद्यार्थ्यांकडून ताडासन, उत्तान पादासन, भुजंगासन, सुप्त वज्रासन, वृक्षासन, पश्‍चिमोत्तासन, नौकासन व चौथीच्या विद्यार्थ्यांकडून आकर्ण धनुरासन, बद्धपद्मासन, मत्स्यासन, अर्ध चंद्रासन, उष्ट्रासन, अर्धकटीचक्रासन करून घेतले. या वेळी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कारही घातले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search