Next
‘जयवंतराव भोसले म्हणजे एक कुशल नेतृत्व’
प्रेस रिलीज
Thursday, August 10, 2017 | 01:52 PM
15 0 0
Share this article:

व्याख्यान देताना कविभूषण डॉ. जयश्री श्रेणिक पाटील. शेजारी लिंबाजीराव पाटील, गुणवंतराव पाटील, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, एम. के. कापूरकरशिवनगर (ता. कराड, जि. सातारा) : ‘दूरदृष्टी असणाऱ्या जयवंतराव भोसले यांनी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले. त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलीला डॉक्टर होता आले,’ असे उद्गार कविभूषण डॉ. जयश्री श्रेणिक पाटील यांनी काढले.

सहकारमहर्षी जयवंतराव भोसले उर्फ अप्पासाहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त कराड तालुका साखर कारखाना संघ आणि श्री गणेश शिवोत्सव मंडळ यांच्यातर्फे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना येथे झाला. या वेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन लिंबाजीराव पाटील, ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, पांडुरंग होनमाने, मनोज पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, राजारामबापू बँकेचे संचालक संग्राम पाटील, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर, श्री गणेश शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिव मुकेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाल्या, ‘अप्पासाहेब म्हणजे एक कुशल नेतृत्व, ज्यांनी आपल्या अनुयायींना पुढे नेण्याचे काम केले. अप्पासाहेब म्हणजे फक्त राजकीय नेतृत्व नव्हते, तर सहकार, कला शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील महामेरू होते. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका घेऊन स्त्रियांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच माझ्यासारख्या खेडेगावातील सामान्य शेतकऱ्याच्या मुलीला डॉक्टर होता आले.’

स्त्री भ्रूणहत्या यावर प्रबोधन करताना ‘स्त्री’, ‘अस्तित्व’, ‘अहो असं का म्हणता’, ‘तू होतीस तेव्हा’, ‘हळद कुंकू’ या कविता सादर केल्या; तसेच ‘लेकी ग तू’ ही ओवी, ‘लेकी जन्माचा पाळणा’ व स्वरचित उखाणे सादर केले. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

या प्रसंगी निर्मला पाटील, सर्जेराव पाटील, तानाजी पाटील, मोहन शेटे, सुरेश साळुंखे, यासीन संदे, एस. के. शिंदे आदींसह सर्व खातेप्रमुख, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी स्वागत केले. एम. के. कापूरकर यांनी प्रास्ताविक केले. व्हाइस चेअरमन लिंबाजीराव पाटील यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search