Next
पाण्यासाठीची वणवण थांबणार
BOI
Wednesday, May 31, 2017 | 04:54 PM
15 0 0
Share this article:

पुणे : मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या उशाशी असलेल्या वेगरे, मांडवखडक व धनवी या गावामधील नागरिकांचा गेल्या अनेक वर्षांचा पाणीटंचाईचा प्रश्न पुण्यातील टेलस ऑर्गनायझेशनच्या पुढाकारामुळे सुटणार आहे. पाइपलाइनच्या कामासाठी या संस्थेने ७० हजार रुपयांचा निधी दिला आहे.

या गावांना गेली अनेक वर्षे तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जवळपासचे पाणीसाठे कडक उन्हामुळे आटल्याने तीन-चार किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. तालुक्यात अनेक गावात पाइपलाइनद्वारे पाणी पुरवले जाते. परंतु टेमघर धरणाच्या कामामुळे ही गावे विस्थापित झाली व अत्यंत दुर्गम ठिकाणी वसवली गेली.
गेले काही दिवस पुण्यातील ‘टेलस ऑर्गनायझेशन’चे लोकेश बापट, तसेच आदर प्रतिष्ठानचे राहुल माने यांनी गावाचे सरपंच भाऊसाहेब मरगळ यांच्या सातत्याने संपर्कात राहून सर्व परिस्थितीच आढावा घेतला. या तिन्ही गावांची पाण्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन वेगरे, मांडवखडक व धनवी गावात पाण्याची व्यवस्था करण्याचे त्यांनी ठरवले. या पाइपलाइनसाठी आवश्यक असणारा ७० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून तो बाळासाहेब फडणवीस यांच्या हस्ते गावचे सरपंच भाऊसाहेब मरगळे यांना देण्यात आला.

टेलस ऑर्गनायझेशनच्या पुढाकारामुळे आता अनेक वस्त्यांची पाण्यासाठीची वणवण संपणार असून, अनेक वर्षांची पाण्याची समस्या दूर होत असल्याने सर्व ग्रामस्थांनी मोठे समाधान व्यक्त केले.
या वेळी राहुल माने, लोकेश बापट, विश्वास घावटे, संकेत जोगळेकर, किमया बापट, मंजू घावटे, राजश्री कडू, जान्हवी बापट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Chetan Salunke About
When good people come together for a good cause good things happen....All the best for the work and efforts taken....
0
0

Select Language
Share Link
 
Search