Next
के. जे. शिक्षणसंस्थेत माजी विद्यार्थी मेळावा
प्रेस रिलीज
Tuesday, July 11, 2017 | 06:46 PM
15 0 0
Share this story

पुणे : के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या के. जे. अभियांत्रिकी, ट्रिनिटी अभियांत्रिकी व ट्रिनिटी अॅकॅडमी या तिन्ही महाविद्यालयांतून उत्तीर्ण होऊन विविध सेवा क्षेत्र व उद्योग क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यशस्वी माजी विद्यार्थ्यांतर्फे सध्या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेवा क्षेत्र व उद्योजकतेवर मार्गदर्शन करण्यात आले.

संस्थेचे खजिनदार विनोद जाधव यांनी अशा वैविध्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना मांडली होती. या कार्यक्रमामध्ये नवोदित विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांना विविध प्रश्न विचारले. मुलाखत कशी द्यावी, तणावाची स्थिती कशी सांभाळावी, परदेशी भाषेचे ज्ञान असावे का, नियमित अभ्यासक्रम हाताळताना आणखी कुठले ज्ञान असावे, तसेच अभियांत्रिकी शाखांनुसार कोणते कौशल्य असावे, अशा विविध प्रश्नांचा सविस्तर ऊहापोह झाला. या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणाऱ्या ५५ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

वार्षिक १२ लाख रुपयांचे सर्वोच्च पॅकेज मिळालेल्या ताहेर अजनावाला या विद्यार्थ्याची मुलाखत घेण्यात आली. स्वतःच्या प्रयत्नांच्या आधारे अनिकेत लगड (इलेक्ट्रॉनिक) या विद्यार्थ्याने कॉर्पोरेट क्षेत्रात कशी प्रगती केली, याविषयीचे अनुभव त्याने व्यक्त केले. त्यामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी परदेशी उच्च शिक्षणाच्या संधी, अर्थपुरवठा यांबद्दलची माहिती दिली व अनुभव व्यक्त  केले. संस्थेच्या आवारातील झेन्सार कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. २००८ साली स्थापन झालेल्या या संस्थेची तीन अभियांत्रिकी महाविद्यालये असून, आजवर तीन हजारांपेक्षाही जास्त विद्यार्थी सेवा क्षेत्र व उद्योग क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करीत आहेत. यामध्ये मुलींनीही अनुभव व्यक्त केले. नवोदित विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

ताहेर अजनावाला (वार्षिक पॅकेज १२ लाख), किरण भामे (यार्दी सॉफ्टवेअर, वार्षिक पॅकेज ४.२ लाख), मुस्तफा बादशहा (झेन्सार बेस्ट परफॉर्मन्स अॅवॉर्ड विनर), हमीद पटेल (झेन्सारचे दोन अॅवॉर्ड), सानिया डिसोझा (बेस्ट परफॉर्मर ऑफ द टीम), आलोक टिबरेवाल (माजी इन्फोसिस कर्मचारी ‘एमएस’साठी निवड, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी), रोहित कुलकर्णी (‘एमएस’साठी निवड) यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या मेळाव्याला ८० ते ९० माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा जाधव, विभावरी जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, के. जे. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश डबीर व ट्रिनिटी अॅकॅडमी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय वढाई यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागप्रमुख प्रमोद दस्तूरकर व राहुल उंडेगावकर यांनी केले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link