Next
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन
BOI
Tuesday, January 15, 2019 | 10:23 AM
15 0 0
Share this article:

आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून शेअर बाजाराची अगदी मुलभूत माहिती देऊन मार्गदर्शन केले आहे.

शेअर बाजारात प्रवेश करताना गुंतवणूकदारांना पडणाऱ्या शेअर कोणते व केव्हा खरेदी करावे, शेअर किती काळ जवळ ठेवावेत व विक्री कधी करावी, या प्रश्नांची उत्तरे यात देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. आर्थिक बाजार रोकड बाजार, कॅपिटल मार्केट, शेअर मार्केट, बॉम्बे व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, इंडेक्स, सेन्सेक्स, निफ्टी या संकल्पना व ‘सेबी’चे कार्य यातून सांगितले आहे.

शेअर बाजारातील पर्याय, अॅनालिसिसचे प्रकार, कॅन्डलस्टिक चार्टिंग, टेक्निकल इंडिकेटर्स, टेक्निकल अॅनालिसिस, त्याच्या केस स्टडी, शेअर बाजाराची महत्त्वाची माहिती कोठून मिळवावी, याबद्दल मार्गदर्शन केले आहे.  

पुस्तक : टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन
लेखक : रवी पटेल
प्रकाशक : बजिंग स्टॉक पब्लिशिंग हाउस
पाने : १९६
किंमत : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search