Next
दुर्गम महाळुंगे गावात श्रमदानातून उभारली आरोग्य केंद्राची इमारत
डॉ. अमोल वाघमारे
Thursday, June 13, 2019 | 05:14 PM
15 0 0
Share this article:आंबेगाव :
जन आरोग्य मंच या संघटनेने पुढाकार घेऊन पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे (पाटण) या छोट्याशा, दुर्गम आदिवासी गावात डॉ. शेखर बेंद्रे यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून आरोग्य केंद्राच्या इमारतीची उभारणी केली. गावकऱ्यांनी श्रमदानातून केवळ १५ दिवसांत ही इमारत उभारली.

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागांत जन आरोग्य मंच व स्थानिक किसान सभा आणि शहीद राजगुरू ग्रंथालयाचे कार्यकर्ते गेल्या १० वर्षांपासून आरोग्य शिबिराचे आयोजन करत आहेत. या आरोग्य शिबिराच्या आयोजनात डॉ. शेखर बेंद्रे यांचा पुढाकार असे. डॉ. शेखर बेंद्रे यांचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले. या भागात आरोग्य केंद्राची उभारणी करण्याचे स्वप्न त्यांनी आपल्या सहकारी मंडळींसोबत पाहिले होते. गेली दोन वर्षे दर रविवारी या आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत दवाखाना चालवला जात आहे. त्या आरोग्य केंद्राला डॉ. शेखर बेंद्रे यांचेच नाव देण्यात आले आहे. (या उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)या आरोग्य केंद्रासाठी ग्रामस्थांनी एक गुंठा जमीन उपलब्ध करून दिली. या परिसरातील सुमारे १००हून अधिक ग्रामस्थांनी व श्रमसंस्कार शिबिरात आलेल्या ४५ युवक-युवतींनी श्रमदानातून १५ दिवसांत या आरोग्य केंद्राची इमारत बांधली. या आरोग्य केंद्रामुळे परिसरातील सात आदिवासी गावांना फायदा होणार आहे.  सरकारी आरोग्य व्यवस्था सार्वत्रिक व गुणवत्तापूर्ण व्हावी, यासाठी लोकशाही मार्गाने वाद-संवाद होणे आवश्यकच आहे; पण जनतेने पुढाकार घेऊन आपल्याच प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पुढे येणे ही नक्कीच सकारात्मक बाब आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 106 Days ago
It is their own effort ! They would be proud of it . There should be more of such activities . Best wishes .
0
0

Select Language
Share Link
 
Search