Next
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’
प्रेस रिलीज
Monday, July 17, 2017 | 12:40 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ. विनिता बाळ यांनी व्यक्त केले. बायकी दृष्टिकोनातून जीवशास्त्राचे आकलन गरजेचे असल्याचेही डॉ. बाळ यांनी नमूद केले.

मराठी विज्ञान परिषद, आयसर आणि गरवारे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक गप्पा कार्यक्रमात डॉ. बाळ ‘जीवशास्त्र : एक बायकी दृष्टिकोन’ या विषयावर बोलत होत्या. या वेळी ‘आयसर’च्या डॉ. अपूर्वा बर्वे, मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे, सचिव नीता शहा, सहसचिव संजय मालती कमलाकर, विनय र. र., डॉ. विद्याधर बोरकर आदी उपस्थित होते.

डॉ. बाळ म्हणाल्या, ‘गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली, तर उच्च शिक्षणामध्ये मुलींची टक्केवारी जास्त आहे; मात्र संशोधन किंवा एखाद्या संस्थेत उच्चपातळीवर काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण तुलनेने अतिशय कमी आहे. दुय्यम असणाऱ्या गोष्टी महिलांना अधिक प्रमाणात कराव्या लागतात. संशोधन क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण कमी असल्याने जीवशास्त्रीय संशोधनाकडे सहसा एकांगी दृष्टिकोनातून पाहिले जाते. बहुतांश वेळा पुरुषांना सोयीस्कर ठरेल, असाच निष्कर्ष यामधून काढला जातो. हे चित्र बदलण्यासाठी अधिकाधिक स्त्रियांनी संशोधन क्षेत्रात सहभाग घेणे आवश्याक आहे.’

प्रा. यशवंत घारपुरे म्हणाले, ‘समाजामध्ये विज्ञान रुजविण्यासाठी मराठी विज्ञान परिषद सातत्याने विज्ञानविषयक व्याख्याने, उपक्रम आयोजित करीत असते. मराठी भाषा आणि विज्ञान याचा मेळ घालून दोन्ही गोष्टी समृद्ध करण्याचे कार्य केले जात आहे. तज्ज्ञांची व्याख्याने, वैज्ञानिक वर्षासहल, विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रकाशन, विज्ञान रंजनस्पर्धा असे विविध उपक्रम परिषदेतर्फे घेतले जातात.’

कार्यक्रमात डॉ. अपूर्वा बर्वे यांनी सूत्रसंचालन केले, तर शहा यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link